स्पॉटलाईट

भयंकर! प्रेयसीला ऍसीड, पेट्रोल टाकून जाळलं! तब्बल 12 तास तडफडली पिडिता आणि अखेर...

साम टीव्ही

प्रेयसीला ऍसिड आणि पेट्रोल टाकून जाळल्याची घटना घडलीय. या तरूणीची झुंज अखेर अपयशी ठरलीय. बीड तालुक्यातील येळंब घाट परिसरात ही घटन घडलीय. धक्कादायक बाब म्हणजे, तब्बल 12 तास ही तरुणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्यात तडफडत होती. तब्बल 48 टक्के भाजलेल्या तरुणीची मृत्यूशी अपयशी झुंज ठरली. आरोपी अविनाश राजुरेसोबत पीडित तरुणी, पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती. दरम्यान दोघेही पुण्याहून बाईकनं गावी परतत असताना, पहाटे तीनच्या सुमारास अविनाश राजुरेने तिच्यावर आधी ऍसिड टाकलं. आणि त्यानंतर,पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळाहून फरार झालाय.

पाहा व्हाडिओ  -

कशी घडली घटना?

पुणे येथे राहत असलेले दोन प्रेमी युगल गावाकडे जात होते. मात्र, बीडच्या येळम्ब परिसरात दोघात वाद झाला आणि रागाच्या भरात प्रियकराने चक्क प्रेयसीवर अ‍ॅसिड हल्ला केला. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ माजली. शनिवारी ही घटना घडली. जखमी प्रेयसीला बीडच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान आज तिचा मृत्यू झाला.

मृत पीडिता ही नांदेड जिल्ह्यातील शेळगाव येथील रहिवासी आहे. त्याच गावातील अविनाश राजूरे याच्यासोबत गेल्या काही महिन्यांपासून ती पुण्यात लिव्ह इनमध्ये राहत होती.

देगलूर तालुक्यातील शेळगाव येथील पीडितेचा विवाह तीन महिन्यांपूर्वी झाला होता. मात्र, गावातच असलेल्या अविनाश राजूरे या तरुणावर तिचे प्रेम होते. लग्नानंतरही प्रेमाच्या आणाभाका घेत आयुष्यभर साथ राहण्याच्या एकमेकांनी शपथा घेतल्या. दोघांनीही गावातून पलायन करुन पुणे गाठले. मात्र, तिथे या दोघांमध्ये वाद होऊ लागले.

अविनाशला दुसरे लग्न करण्यासाठी घरातील मंडळीने घाट घातला होता. त्यामुळे अविनाशने गावाकडं जाण्यासाठी पीडितेला सोबत घेतले. दोघेही पुण्यावरुन दुचाकीवर गावाकडे निघाले. बीडजवळ येताच अविनाशने तिच्या अंगावर अ‍ॅसिड फेकले आणि तिथून पसार झाला. पीडितेने आरडाओरड केल्यानंतर परिसरातून जाणारे नागरिक तिच्या मदतीला धावले.A

जखमी पीडितेला बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान तिचा आज मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी पीडितेने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितल्यावर पोलिसांनी आरोपी अविनाशविरुद्ध नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपी अद्याप फरार आहे. अविनाशला पकडण्यासाठी बीड पोलिसांनी एक पथक रवाना केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Krishna Janmashtami 2026 : 4 की 5 सप्टेंबर? यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि शुभ मुहूर्त

Dhaniya Panjiri Recipe : जन्माष्टमीला श्रीकृष्णासाठी खास नैवेद्य! 'अशी' बनवा फक्त १० मिनिटांत चविष्ट पंजिरी

Heart Attack in Women: 70% महिलांकडून हार्ट अटॅकची 'ही' लक्षणं दुर्लक्षित; अचानक जाणवणारा थकवा असू शकतो मोठा रेड फ्लॅग

Eyebrow Tips : १ हफ्त्यात पातळ आयब्रो करा घनदाट आणि जाड ; घरच्या घरी बनवा हे सीरम

Crime: १६ वर्षीय मुलीवर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार, घरच्यांवर नाराज होऊन घराबाहेर पडली अन् भयंकर घडलं

SCROLL FOR NEXT