स्पॉटलाईट

VIDEO | सर्वांनाच खडसे हवेत मात्र, खडसेंची पाऊले कोणाकडे वळणार?

आश्विनी जाधव केदारी

जळगावात महाजनांना शह देण्यासाठी शिवसेनेने खडसेंना पक्षात घेण्याची तयारी केलीय. तर राष्ट्रवादीनेही खडसेंसाठी गळ टाकल्याने खडसेंसमोर संभ्रम निर्माण झालाय.

सध्या भाजपमध्ये नाराज असलेल्या खडसेंनी पक्षबदलाचे संकेत दिलेत. मात्र तूर्तास तरी पक्ष सोडणार नसल्याचं सांगत त्यांनी आपल्या भूमिकेबाबतचा संभ्रमही कायम ठेवलाय. त्यामुळे एकिकडे राष्ट्रवादी तर दुसरीकडे शिवसेनेनेही खडसेंना आपल्या पक्षात खेचण्यासाठी गळ टाकून ठेवलाय. 

उत्तर महाराष्ट्रात सध्या भाजपचं वर्चस्व आहे. सध्या खडसेंना डावलून भाजप नेतृत्वाने गिरीश महाजनांना बळ दिलंय. मात्र तरीही या पट्ट्यात अजूनही एकनाथ खडसे आपला राजकीय प्रभाव राखून आहेत.
त्यातच खडसे आणि महाजन यांच्यातील वैर सर्वश्रूत आहे. त्यामुळे खडसेंचा वापर करून उत्तर महाराष्ट्रात आपला पक्ष मजबूत करण्याचे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मनसूबे आहेत. 

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात गिरीश महाजनांनी बंडखोर उभे केल्याने पराभव झाल्याची शिवसेनेची भावना आहे. त्यामुळे खडसेंना बळ देत महाजनांची खोड मोडण्याची शिवसैनिकांची इच्छा आहे. आता पाहायचं एवढंच की महाजनांना शह देण्यासाठी खडसे नेमकी कुठल्या पक्षाची वाट निवडतात.

Web Title -  shivsena, Ncp and Congress want Eknath Khadse in  North Maharashtra for party expansion

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chicken Kabab Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंटसारखे ज्यूसी -क्रिस्पी चिकन कबाब

चुकीच्या UPI ID वर पैसे ट्रान्सफर झालेत? टेन्शन नका घेऊ; या स्टेप्स फॉलो करा, मिनिटात पैसे येतील परत

Maharashtra Live News Update: भाजपकडून वीज बिल वाटणाऱ्या तरुणाला उमेदवारी

Mustard Oil For Skin: त्वचेला लावा मोहरीचे तेल, फक्त १० दिवसांत दिसेल मोठा फरक

Raigad Tourism : साहसप्रेमींसाठी आव्हानात्मक ट्रेकचा अनुभव, रायगडजवळील 'हा' किल्ला एकदा नक्की पाहा

SCROLL FOR NEXT