Rohit Sharma And Virat Kohli saam tv
Sports

Rohit Sharma : विराट कोहलीप्रमाणे तू पण मोठी स्पर्धा हरला, रोहित शर्माने 'असं' उत्तर दिलं की...

आशिय कप स्पर्धेतील भारताचं आव्हान जवळपास संपण्याच्या मार्गावर आहे.

नरेश शेंडे

दुबई : आशिया करंडक स्पर्धा २०२२ मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात काल रविवारी रंगतदार सामना झाला. या अटीतटीच्या सामन्यात श्रीलंकेने भारताचा सहा विकेट आणि एक चेंडू राखून पराभव केला. सुपर ४ मध्ये आधी पाकिस्तान आणि नंतर श्रीलंके विरुद्ध पराभव झाला. त्यामुळे आशिय कप स्पर्धेतील (Asia Cup 2022) भारताचं आव्हान जवळपास संपण्याच्या मार्गावर आहे. या पराभवामुळं टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा, गोलंदाज अर्शदीप सिंग आणि भूवनेश्वर कुमारवर सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे टीकेचे धनी झाले आहेत. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात हा एक पहिली मल्टीनॅशनल टुर्नामेंट होती. मात्र, या स्पर्धेत भारताचा पत्ता कट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Rohit Sharma press conference in asia cup 2022)

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) असताना भारताला कोणतीही आयसीसीची मोठी टुर्नामेंट जिंकता आली नाही. त्यामुळे कोहलीवर टीकेची झोड उठवली गेली. अशातच आता भारताचा श्रीलंके विरोधात पराभव झाल्याने कर्णधार रोहित शर्माला याबाबत प्रश्न विचारण्यात आले. यावेळी पत्रकार परिषदेत रोहितला प्रश्न केला, विराट कोहली कर्णधार असताना भारत द्विपक्षीय मालिका जिंकत होता. मोठी टुर्नामेंट आणि आयसीसी इव्हेंटमध्ये पराभव होत होता. तुझ्यासोबतही असंच घडत आहे, यावर प्रतिक्रिया देताना रोहित म्हणाला, भारतीय संघात कसलीच कमी नाहीय. आमच्या संघात गुणवत्ता आहे. भारतीय संघाने सतत अनेक सामने खेळले आहेत. या सामन्यांत विजय संपादनही केलं आहे.

ज्या टुर्नामेंटमध्ये वेगवेगळे संघ असतात, तेव्हा दबाव खूप असतो. द्विपक्षीय मालिकेत तुमच्या समोर एकाच संघाचं आव्हान असतं. त्यामुळे एकाच संघाविरोधात रणनीती ठरवावी लागते. पण अशा मोठ्या टुर्नामेंटमध्ये वेगवेगळ्या संघाविरुद्ध खेळणं आव्हानात्मक असतं. आमच्या संपूर्ण संघाला माहितीय की, आयसीसी टुर्नामेंटमध्ये चांगली कामगिरी करणं एक आव्हान आहे. आम्ही यापूर्वीही आयसीसी इव्हेंट खेळलो आहोत. आम्ही जिंकलो आहोत. यापुढेही आम्ही सुधारणा करत राहू, असंही रोहित पत्रकार परिषदेत म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं पुन्हा महागलं! १० तोळ्याागे ७७०० रुपयांची वाढ; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Maharashtra Live News Update: पुण्यात काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र लढण्याचा प्रस्ताव

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात युद्धांतील मृत सैनिकांचा सन्मान कसा केला जात असे?

Box Office Collection: 'धुरंधर'ने मारली बाजी, केलं कोट्यवधींच कलेक्शन; जाणून घ्या कार्तिक आर्यनच्या चित्रपटाची कमाई

Gajkesari Rajog 2026: 2 जानेवारीपासून चमकणार या राशींचं भविष्य; 12 वर्षांनी बनणार शक्तीशाली गजकेसरी राजयोग

SCROLL FOR NEXT