Yashasvi Jaiswal  Saam Tv
Sports

Yashasvi Jaiswal: ऐन IPLच्या धुमधडाक्यात यशस्वीचा धक्कादायक निर्णय

Yashasvi Jaiswal: टीम इंडियाचा स्फोटक सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने मुंबई सोडण्याचा निर्णय घेतलाय. वृत्तानुसार, जयस्वाल मुंबईचा रणजी संघ सोडण्याच्या विचारात आहे.

Bharat Jadhav

यशस्वी जयस्वाल धमाकेदार फलंदाजीसाठी ओळखला जातो. सलामीवीर यशस्वी फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. परंतु या मॅच विनर खेळाडूने संघ सोडण्याची परवानगी मागितली आहे. जयस्वी जयस्वालला मुंबईचा रणजी संघ सोडायचा आहे. त्याबाबत त्याने मु्ंबई क्रिकेट असोसिएशन पत्र लिहित एनओसी मागितलीय.

जयस्वाल कोणत्या संघाकडून खेळणार?

मुंबईचा रणजी संघ सोडण्याचा निर्णय घेण्यामागे जयस्वालने वैयक्तिक कारण सांगितलंय. वृत्तानुसार, यशस्वी जयस्वालने मुंबई सोडून गोव्याला जाण्याचा निर्णय घेतलाय. जयस्वालला येत्या रणजी मोसमात गोव्याकडून क्रिकेट खेळायचे आहे.

याआधीही अनेक खेळाडूंनी मुंबई सोडून गोव्याकडून रणजी सामने खेळले आहेत. अनेक यातील एक लोकप्रिय नाव म्हणजे अर्जुन तेंडुलकर. तोही आधी मुंबईसाठी रणजी करंडक खेळत असायचा, पण आता तो गेल्या ३ हंगामात गोव्याकडून रणजी ट्रॉफी खेळत आहे.

पृथ्वी शॉनेही मुंबई सोडत गोव्याच्या संघाकडून रणजी सामना खेळलाय. आता यशस्वी जयस्वाललाही या संघाचा सदस्य व्हायचे आहे. वृत्तानुसार, यशस्वी जयस्वाल गोव्याचा कर्णधार होऊ शकतो. मात्र याबाबत कोणतीच माहिती समोर आली नाहीये. यशस्वी जयस्वाल यांनी एनओसीसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला ईमेल केल्याचे सांगण्यात येत आहे.

2019 मध्ये मुंबईसाठी पदार्पण केलं

यशस्वी जयस्वालने २०१९ मध्ये मुंबईसाठी पदार्पण केल होतं. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटचा पहिला सामना छत्तीसगड विरुद्ध खेळला होता. पहिल्या सामन्यात त्याला विशेष खेळी करता आली नव्हती. पण त्यानंतर जयस्वालने खूप धावा केल्या. या डावखुऱ्या फलंदाजाने 36 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 60 पेक्षा जास्त सरासरीने 3712 धावा केल्या आहेत. जयस्वालने 13 शतके आणि 12 अर्धशतके केली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup: नेदरलँड्सने वाढवली होती धडधड; टीम इंडियाचं गचाळ क्षेत्ररक्षण तरीही भारताचा रोमांचक विजय

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT