yashasvi jaiswal twitter
Sports

Yashasvi Jaiswal: 4,4,4,4..यशस्वीने स्टार्कला पहिल्याच ओव्हरमध्ये धुतला! मोठ्या रेकॉर्डवर कोरलं नाव

Yashasvi Jaiswal Scored 16 runs In Mitchell Starc Over: भारताचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने मिचेल स्टार्कच्या पहिल्याच षटकात १६ धावा कुटल्या आहेत.

Ankush Dhavre

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात भारतीय संघाला तेज तर्रार सुरुवातीची गरज होती. त्यामुळे टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करणं गरजेचं होतं.

भारतीय संघाकडून फलंदाजी करताना ही जबाबदारी यशस्वी जयस्वालने स्विकारली आणि पहिल्याच षटकात मिचेल स्टार्कचा चांगलाच समाचार घेतला. त्याने पहिल्याच षटकात फलंदाजी करताना १,२ नव्हे तर ४ चौकारांसह १६ धावा चोपल्या .

यशस्वीचे ४ चौकार

भारतीय संघाकडून डावाची सुरवात करण्यासाठी यशश्वी जयस्वाल आणि केएल राहुलची जोडी मैदानावर आली. यशस्वी जयस्वालने स्ट्राईक घेतली, तर मिचेल स्टार्क गोलंदाजीला होता. आधी त्याने स्लिपच्या वरुन कट शॉट खेळून चौकार मारला. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर त्याने कट शॉट मारुन चौकार मारले. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने त्याने चौथा चौकार मारला.

यशस्वी जयस्वालने रचला इतिहास

यशस्वी जयस्वाल ४ चौकार मारत मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. यशश्वी जयस्वालने या षटकात ४ चौकारांसह १६ धावा वसूल केल्या. यासह तो कसोटी सामन्यातील पहिल्याच षटकात सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. तर दुसरीकडे मिचेल स्टार्कचं हे सर्वात महागडं षटकही ठरलं आहे. यापूर्वी २०२२ मध्ये त्याने पहिल्याच षटकात गोलंदाजी करताना १७ धावा खर्च केल्या होत्या.

भारतीय संघाकडे ४ धावांची आघाडी

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाचा डाव १८५ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाला अवघ्या १८१ धावांवर आटोपला.

ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना वेबस्टरने सर्वाधिक ५७ धावांची खेळी केली. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना मोहम्मह सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी ३-३ गडी बाद केले. तर जसप्रीत बुमराह आणि नितीश कुमार रेड्डीने प्रत्येकी २-२ गडी बाद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT