Yashasvi Jaiswal Wicket: यशस्वी जयस्वाल आऊट नव्हताच! बॉल बॅटचा काही संपर्क नाही, तरीही अंपायरने दिलं Out

IND vs AUS, Yashasvi Jaiswal Wicket Controversy: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वाल आऊट नव्हताच. तरीदेखील तिसऱ्या अंपायरने त्याला बाद घोषित करुन माघारी धाडलं आहे.
Yashasvi Jaiswal Wicket: यशस्वी जयस्वाल आऊट नव्हताच! बॉल बॅटचा काही संपर्क नाही, तरीही अंपायरने दिलं Out
yashasvi jaiswaltwitter
Published On

भारतीय संघाकडून फलंदाजी करताना यशस्वी जयस्वालने दोन्ही डावात शानदार खेळी केली. पहिल्या डावात फलंदाजी करताना त्याने ८२ धावांची खेळी केली. त्याला शतक झळकावण्याची सुवर्णसंधी होती. मात्र त्याला धावबाद होऊन माघारी परतावं लागलं होतं.

त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघाला सामना जिंकण्यासाठी ३४० धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वालने शानदार ८४ धावांची खेळी केली. मात्र एका चुकीच्या निर्णयामुळे त्याला बाद होऊन माघारी परतावं लागलं आहे.

यशस्वी जयस्वालच्या बाबतीत दिलेला निर्णय पूर्णपणे चुकीचा असल्याचं दिसून आलं. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना यशस्वी जयस्वाल एकटा फलंदाज होता ज्याने २०० पेक्षा अधिक चेंडू खेळून काढल होते. भारतीय संघाला सामना ड्रॉ करण्यासाठी यशस्वी जयस्वालने खेळपट्टीवर टिकून राहणं महत्वाचं होतं. दरम्यान अंपायरच्या एका चुकीच्या निर्णयामुळे त्याला बाद घोषित करण्यात आलं.

Yashasvi Jaiswal Wicket: यशस्वी जयस्वाल आऊट नव्हताच! बॉल बॅटचा काही संपर्क नाही, तरीही अंपायरने दिलं Out
IND vs AUS: 1 ओव्हर,0 रन अन् 2 विकेट; अवघ्या 5 मिनिटात असा फिरला सामना

यशस्वी जयस्वाल आऊट होता?

तर झाले असे की, यशस्वी जयस्वाल ८४ धावांवर फलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलियाकडून ७१ वे षटक टाकण्यासाठी पॅट कमिन्स गोलंदाजीला आला. या षटकातील पाचवा चेंडू कमिन्सने लेग साईडच्या दिशेने टाकला.

या चेंडूवर जयस्वालने थर्ड मॅनच्या दिशेने शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या ग्लोव्ह्जमध्ये गेला. त्यावेळी गोलंदाजासह सर्वांनीच जोरदार अपील केली. मात्र अंपायरने ही अपील फेटाळून लावली. अंपायरने अपील फेटाळताच कमिन्सने DRS ची मागणी केली.

Yashasvi Jaiswal Wicket: यशस्वी जयस्वाल आऊट नव्हताच! बॉल बॅटचा काही संपर्क नाही, तरीही अंपायरने दिलं Out
IND vs AUS: बॉक्सिंग डे कसोटी ड्रॉ झाल्यास टीम इंडियासाठी कसं असेल WTC Final मध्ये जाण्याचं समीकरण?

तिसऱ्या अंपायरने हा निर्णय द्यायला उशिर लावला. आधी अंपायरने रियल टाईव्ह व्हिव्ह पाहिला आणि चेंडू बॅटला लागून केलाय का, हे पाहिलं. यात चेंडू बॅटला लागलाय की नाही, हे समजून येत नव्हतं. त्यानंतर अंपायरने स्निको मीटरचा वापर केला. स्निको मीटरमध्ये पाहिले असता, चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क न झाल्याचे दिसून आले.

मात्र तरीदेखील अंपायरने त्याला बाद घोषित केलं. अंपायरच्या या निर्णयावरुन यशस्वी जयस्वाल भडकला. त्याने मैदान सोडण्यापूर्वी अंपायरशी चर्चा केली. समालोचकही भडकले. मात्र अंपायरच्या निर्णयामुळे त्याला माघारी परतावं लागलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com