yashasvi jaiswal X
Sports

Yashasvi Jaiswal Girlfriend : यशस्वी जयस्वाल परदेशी तरुणीला करतोय डेट? इंस्टाग्राम पोस्टमधली मिस्ट्री गर्ल कोण?

Yashasvi Jaiswal Rumored Girlfriend : यशस्वी जयस्वालने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका फोटोची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. फोटोमध्ये यशस्वीसोबत एक परदेशी मुलगी असल्याचे पाहायला मिळते. व्हायरल फोटोमधील मिस्ट्री गर्ल कोण आहे? जाणून घ्या...

Yash Shirke

भारताचा तरुण फलंदाज यशस्वी जयस्वाल मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्याने मुंबई सोडून गोव्याकडून रणजीसह अन्य देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा खेळण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या यशस्वी आयपीएलमध्ये व्यस्त आहे. याच दरम्यान त्याने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका फोटोची सर्वत्र चर्चा होत आहे.

यशस्वी जयस्वालने काही तासांपूर्वी एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. या फोटोमध्ये यशस्वी जयस्वाल त्याची कथित प्रेयसी मॅडी हॅमिल्टन आणि तिचा भाऊ हेन्नी हॅमिल्टन असल्याचे पाहायला मिळते. या फोटोला “Time may pass but bonds never fade, grateful for moments like these.” असे कॅप्शन दिले आहे.

यशस्वी जयस्वालची कथित गर्लफ्रेंड मॅडी हॅमिल्टन याआधीही क्रिकेटच्या स्टेडियमवर आणि काही सार्वजनिक ठिकाणी दिसली आहे. याआधी त्यांचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना सुरुवात झाली होती. आता यशस्वीने शेअर केलेल्या इन्स्टाग्रामवरील फोटोंमुळे त्यांच्या डेटिंगच्या चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत. पण त्यांच्या नात्याबद्दल यशस्वीने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

कोण आहे यशस्वी जयस्वालची कथित गर्लफ्रेंड?

यशस्वी जयस्वालच्या कथित गर्लफ्रेंडचे नाव मॅडी हॅमिल्टन (Maddie Hamilton) असे आहे. ती इंग्लंडमध्ये राहते. सध्या ती शिक्षण घेत असल्याचे म्हटले जात आहे. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यादरम्यान ती सामना पाहण्यासाठी आली होती. तिने यशस्वी मैदानात खेळत असताना त्याला सपोर्ट केला होता. तेव्हापासून यशस्वी आणि त्याच्या कथित गर्लफ्रेंडचे नाव चर्चेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shantanu Naidu Girlfriend : रतन टाटांचा विश्वासू शांतनु नायडूकडून प्रेमाची कबुली; फोटोतील तरुणी आहे तरी कोण?

Maharashtra Live News Update:आयुष कोमकर खूनप्रकरणी २ जणांना अटक तर १३ जणांवर गुन्हा

Pune Metro : पुणे मेट्रो सुसाट! २४ तासांत तब्बल ६ लाख जणांचा प्रवास, गणेशोत्सवात मेट्रोची कोट्यवधींची कमाई

Coconut Chikki Recipe :घरीच १० मिनिटांत बनवा खोबऱ्याची चिक्की, मिळेल मार्केटसारखी चव

Ankita Walawalkar : सलमान खानच्या 'Bigg Boss 19' मध्ये अंकिता वालावलकरची वाइल्ड कार्ड एन्ट्री? पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT