yashasvi jaiswal twitter
Sports

IND vs ENG: टीम इंडियाचा हा स्टार फलंदाज ठरणार गेम चेंजर! रेकॉर्ड पाहून इंग्लंडच्या गोलंदाजांचा थरकापच उडेल

Yashasvi Jaiswal: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेत भारताचा युवा फलंदाज इंग्लंडच्या गोलंदाजांसाठी धोक्याची घंटा ठरु शकतो.

Ankush Dhavre

Team India Game Changer In IND vs ENG Test Series:

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना येत्या २५ जानेवारी रोजी खेळला जाणार आहे. हा सामना हैदराबादच्या मैदानावर रंगणार आहे. या मालिकेसाठी युवा फलंदाज यशस्वी जयस्वालला संघात स्थान दिलं गेलं आहे. तो रोहितसोबत डावाची सुरुवात करताना दिसून येणार आहे.

कसोटी मालिकेत गेम चेंजर ठरणार हा फलंदाज..

डाव्या हाताचा आक्रमक फलंदाज यशस्वी जयस्वाल पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. सामन्यातील एका सेशनमध्ये तो सामना संघाकडे फिरवू शकतो. त्यामुळे हा युवा फलंदाज भारतीय संघासाठी गेमचेंजर ठरु शकतो.

भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागही निडर होऊन फलंदाजी करायचा. यशस्वी जयस्वालच्या फलंदाजीतही त्याची झलक दिसते. इंग्लंडकडून ओली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन, मार्क वुड आणि जॅक लीचसारखे गोलंदाज आक्रमण करतील. यशस्वी जयस्वाल या गोलंदाजांविरुद्ध हल्लाबोल करताना दिसून येऊ शकतो.

नुकताच तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत फलंदाजी करताना दिसून आला होता. मात्र त्याला या मालिकेत हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. इंग्लंडला जर या सामन्यात बॅकफुटवर ढकलायचं असेल तर यशस्वी जयस्वालने विकेट न टाकता संघाला चांगली सुरुवात करुन देणं अतिशय गरजेचं असणार आहे. जयस्वालने आतापर्यंत ४ कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ४५.१४ च्या सरासरीने ३१६ धावा केल्या आहेत. ज्यात १ शतक आणि १ अर्धशतकाचा समावेश आहे. (Latest sports updates)

इंग्लंडविरद्ध होणाऱ्या सुरुवातीच्या दोन कसोटी मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक),आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि आवेश खान.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादीच्या पाठीशी उभं राहणं आमची जबाबदारी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Union Budget 2026: अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींसाठी आणखी एक मोठी घोषणा, सुरु केली नवीन योजना; फायदा काय?

Budget 2026: रिवाइज्ड ITRसाठी मुदतवाढ; नवीन प्राप्तिकर कायदा कधीपासून होणार लागू?

Rohit Shetty House Firing: रोहित शेट्टी हल्ला प्रकरणाला नवे वळण; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाशी थेट कनेक्शन

महाराष्ट्राला अर्थसंकल्पातून काय काय मिळालं? देवेंद्र फडणवीसांनी दिली A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT