IPL RCB team  Social Media
Sports

RCB Update : IPL सुरू होण्याआधीच विराटच्या बेंगळुरू संघाला मोठा झटका, आणखी एक खेळाडू स्पर्धेतून आऊट

Virat Kohli Team Hit Hard Yash Dayal Out Before IPL 2026 : आयपीएल स्पर्धा सुरू होण्याआधीच विराट कोहलीच्या आरसीबी संघाला तगडा झटका बसला आहे. संघाचा वेगवान गोलंदाज यश दयाल संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला आहे.

Nandkumar Joshi

Yash Dayal Out Of IPL 2026 : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल स्पर्धा २८ मार्चपासून सुरू होणार आहे. जगातील सर्वात श्रीमंत असलेली आयपीएल स्पर्धा सुरू होण्याआधीच गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला मोठा झटका बसला आहे. संघाचा वेगवान गोलंदाज यश दयाल संपूर्ण स्पर्धा खेळणार नाही. आरसीबी (RCB) संघाचे डायरेक्टर मो बोबाट यासंदर्भात माहिती दिली.

याआधीही आरसीबी संघाला जोश हेजलवुड याच्या रुपाने मोठा हादरा बसला होता. हेजलवुड हा सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाही.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाची गोलंदाजी कमकुवत होत असल्यानं चिंता वाढली आहे. आरसीबी संघाचे डायरेक्टर मो बोबाट यांनी यश दयालबाबत महत्वाची माहिती दिली. आरसीबीसाठी यश दयाल या पर्वात खेळू शकणार नाही. काही वैयक्तिक कारणांमुळं त्यानं हा निर्णय घेतला आहे. संघानं अद्याप त्याच्या जागी कोणत्याही खेळाडूची निवड केलेली नाही. आता दयालच्या जागी कोणत्या खेळाडूला संधी मिळते, याची उत्सुकता आहे. यश दयाल यानं मागील पर्वात खेळताना चांगली गोलंदाजी केली होती. मागील पर्वात त्याने आरसीबीसाठी खेळताना १३ विकेट घेतल्या होत्या.

यश दयाल अलीकडच्या काळात बऱ्याच घटनांमुळं चर्चेत होता. यंदाची आयपीएल स्पर्धा सुरू होण्यास काही दिवसच शिल्लक आहेत. पण तो आरसीबी संघाच्या ट्रेनिंग कॅम्पमध्येही सहभागी झाला नाही. त्यामुळं तो यंदा आयपीएल स्पर्धा खेळणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. या चर्चांना संघाच्या डायरेक्टर बोबाट यांनी पूर्णविराम दिला आहे.

यश यंदा संघात सहभागी होऊ शकणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. यश सध्या काही वैयक्तिक कारणांमुळं वेगळ्याच परिस्थितीतून जात आहे. यशला आमचा कायम पाठिंबा होता. जेव्हा आमच्याकडे खेळाडूंना रिटेन किंवा रिलीज करण्याची संधी होती, तेव्हा आम्ही यशला रिटेन केलं. आम्ही त्याच्या सातत्याने संपर्कात आहोत. त्याच्यासोबत आज देखील चर्चा केली, असं बोबाट म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

५ महिलांचे लैंगिक शोषण, ८ महिलांचे ३५ व्हिडिओ, भोंदू खरातचे अश्लील चाळे; CM फडणवीसांनी सांगितली A to Z माहिती

Co-ord Sets: उन्हाळ्यात ऑफिस किंवा कॉलेजसाठी ट्राय करा हे ७ कॉटनचे ट्रेंडी आणि कम्फर्टेबल को-ऑर्ड सेट्स

Election : पुण्यात निवडणुकीचं बिगुल वाजलं, २६ ग्रामपंचायतीत धुरळा उडाला, वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : अशोक खरातला ५ दिवसांची पोलीस कोठडी

Shocking : लुडो खेळताना चिमटा काढला, भावाला नाव सांगतो म्हणाली; दिराचा पारा चढला, वहिनीसोबत केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT