Siddharam Sakhare Saam Tv
Sports

Accident: जीप- ट्रकच्या अपघातात नामवंत मल्लाचा मृत्यू; कुस्ती क्षेत्रात शाेककळा

बोरामणी गावावर पसरली शाेककळा.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : हैदराबाद महामार्गावर दोड्डी येथे जीप आणि ट्रकच्या अपघातात (accident) मल्ल (wrestler) सिद्धाराम साखरे (Siddharam Sakhare) यांचे बुधवारी रात्री निधन झाले. कुस्तीत अखिल भारतीय स्तरावर मल्ल साखरे यांनी उज्जवल कामगिरी केली हाेती. त्यांच्या निधनानं क्रीडा (sports) क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. (wrestler siddharam sakhare passes away in road accident)

साखरे यांच्या पाठीमागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. साखरे हे पाेलिस (police) सेवेतून निवृत्त झाले हाेते. त्यांनी अनेक गुंडांना कायद्याचा धाक दाखविला हाेता. त्यामध्ये गुंड गजा मारणेचा देखील समावेश आहे.

साखरे यांचे भाऊ मल्लिनाथ हे देखील सहाय्यक फौजदार पदावरुन नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. दूसरे बंधू चिदानंद हे हवालदार म्हणून सध्या कर्तव्य बजावत आहेत. मल्ल साखरे यांनी सन १९८० कालावधीत सोलापुरात (solapur) बाला रफीक शेख यांना पराभव केल्याचा किस्सा आजही क्रीडा क्षेत्रात विशेषत: त्यांच्या बोरामणी ग्रामस्थांच्या स्मरणात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

Maharashtra News Live Update: संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी इंडिया आघाडीचा मोर्चा- वर्षा गायकवाड

Joint pain causes: सांधे दुखत असतील तर सावध व्हा! वाढतं वयच नाही, तर ही कारणंही ठरू शकतात सांधेदुखीला जबाबदार

Seasonal Fruits : कोणत्या हंगामात कोणती फळे खावी? ९९% लोक करतात 'ही' १ चूक

ATM Robbery : नाईटी, मास्क घालून आले अन् SBI चं एटीएम फोडले; २५ लाख घेऊन चोर पसार, CCTV पाहून पोलीसही चक्रावले

SCROLL FOR NEXT