World Test Championship 2025 cricinfo
Sports

WTC फायनलमध्ये मोठा डाव टाकला, पण फसला; ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का

World Test Championship 2025 चा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांमध्ये रंगला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने घेतलेला मोठा निर्णय फसला आहे.

Yash Shirke

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलामीवीर म्हणून मार्नस लबूशेनला मैदानात उतरवण्याचा ऑस्ट्रेलियाचा निर्णय फसला. सामन्याच्या पहिल्या सत्रात लबूशेन बराच वेळ क्रीजवर होता. पण तो धावा करण्यात किंवा क्रीजवर टिकून राहण्यास यशस्वी राहिला नाही. मार्को जॉन्सनने लबूशेनला बाद केले. ऑस्ट्रेलियाकडे सॅम कॉन्स्टास हा उत्तम सलामीवीर असतानाही ऑस्ट्रेलियाने मार्नसला सलामीवीर म्हणून मैदानात उतरवले.

मार्नस लबूशेनने ५५ चेंडूमध्ये फक्त १७ धावा काढल्या. सावधगिरीने खेळताना जोखीम घेणे टाळले. काही चेंडूंवर चांगले शॉर्ट्स मारले. पण त्याला धावसंख्या वाढवता आली नाही. डावात त्याने फक्त एक चौकार मारला. मार्नस लबूशेन हा ऑस्ट्रेलियासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येतो. तो पहिल्यांदाच सलामीसाठी आला होता.प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५ सामन्यांमध्ये सलामीसाठी मैदानात उतरण्याचा अनुभव लबूशेनकडे असला तरीही, २०१६ मध्ये त्याने ऑस्ट्रेलियासाठी सलामीवीर म्हणून फलंदाजी केली होती.

डेव्हिड वॉर्नरने निवृत्ती घेतल्यापासून ऑस्ट्रेलिया कसोटी संघात सलामीवीराच्या शोधात आहे. पण आतापर्यंत त्यांना एकही चांगला सलामीवीर खेळाडू सापडलेला नाही. भारताविरुद्ध मालिकेमध्ये सॅम कॉन्स्टास ख्वाजासह सलामीसाठी उतरला होता. पण नंतर श्रीलंकेविरुद्धेच्या कसोटी मालिकेत हेडला मैदानात पाठवण्यात आले. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा निर्णय फसला आहे.

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांमध्ये लॉर्ड्स स्टेडियमवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सुरु आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर उस्मान ख्वाजा आणि मार्नस लबूशेन हे दोन फलंदाज सलामीसाठी आले. रबाडाने शून्यावर ख्वाजाला बाद केले. तर मार्नस लबूशेनने फक्त १७ धावा केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunetra Pawar : सुनेत्रा वहिनींनी मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावं, आई एकविरा चरणी राष्ट्रवादीच्या आमदाराचं साकडं

8th Pay Commission: २०२६ की २०२७; कधी होणार आठवा वेतन आयोग लागू? केंद्र सरकारने स्पष्टच सांगितलं

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी पंपासमोर ३ ते ४ किलोमीटरच्या रांगा

Mumbai : डोकं रिक्षावर आपटलं, फरफडत नेलं; ४ वर्षांच्या चिमुरड्याला अमानुष मारहाण, वसईचा व्हिडिओ पाहून काळजाचा ठोका चुकेल!

भोंदू बाबा अशोक खरातवर शिर्डीत गुन्हा दाखल; 4 एकर भूखंड बळकावला|VIDEO

SCROLL FOR NEXT