आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे. जगभरातील क्रिकेट चाहते या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान या मेगा इव्हेंटपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वर्ल्डकपचं थीम साँग लाँच केलं आहे. यंदाच्या वर्ल्डकपचं थीम साँग दिल जश्न बोले असं असणार आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.
वर्ल्डकपच्या थिम साँगमध्ये रणवीर सिंगचा डान्स..
वनडे वर्ल्डकपच्या थीम साँगमध्ये रणवीर सिंग डान्स करताना दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये रणवीर सिंग लहान मुलाला क्रिकेट फॅन असण्याचं महत्व समजावून सांगताना दिसून येत आहे. त्यानंतर तो चालत्या ट्रेनमध्ये डान्स करताना दिसून येत आहे.
या व्हिडिओमध्ये रणवीर सिंगसह संगीतकार प्रीतम आणि समालोचक जतीन सप्रू देखील असल्याचं दिसून येत आहे. हे सर्व भन्नाट डान्स करताना दिसून येत आहेत.
भारतीय संघाचा वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरूद्ध रंगणार आहे. या स्पर्धेपुर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ ३ वनडे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आमने सामने येणार आहे.
या मालिकेतील पहिला सामना २२ सप्टेंबर रोजी पंजाब क्रिकेट असोशिएशनच्या मैदानावर रंगणार आहे. या मालिकेतील सुरूवातीच्या २ सामन्यांसाठी कर्णधार रोहित शर्मा, हार्दिक पंड्या,विराट कोहली आणि कुलदीप यादवसारख्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तर सुरूवातीच्या २ सामन्यांमध्ये भारतीय संघाची जबाबदारी केएल राहुलकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (Latest sports updates)
ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:
केएल राहुल (कर्णधार, यष्टीरक्षक), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ईशान किशन,सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा , जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, वाशिंगटन सुंदर
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.