Hardik Pandya Saam Tv
Sports

IND Vs PAK World Cup: 'कुंग फू' पांड्या झाला 'मांत्रिक' पांड्या; इमामच्या विकेट घेण्याआधी चेंडूसोबत पुटपुटला

Hardik Pandya: भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात 'कुंग फू' पांड्या 'मांत्रिक' पांड्या झाल्याचं पाहायला मिळालं.

Bharat Jadhav

IND Vs PAK World Cup Hardik Pandya:

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तान संघाचा दारूण पराभव केला. या सामन्यामध्ये 'कुंग फू' पांड्या 'मांत्रिक' पांड्या झाल्याचं पाहायला मिळालं. (Latest News)

पाकिस्तानसाठी इमाम-उल-हक आणि अब्दुल्ला शफीक यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी केली. अब्दुल्ला शफिकला बाद करून मोहम्मद सिराजने पाकिस्तानला पहिला धक्का दिला. यानंतरही डावखुरा फलंदाज इमामला हार्दिकने पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.

शॉर्ट पिच चेंडूंवर बाद होणाऱ्या इमामने सिराजला तीन चौकार लगावले. त्याची फलंदाजीत धार आल्याचं दिसत होतं. त्याचदरम्यान जसप्रीत बुमराहनंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने हार्दिक पांड्याकडे गोलंदाजी दिली. हार्दिकने १२.३ षटकांत भारतीय संघाला आनंद मिळून दिला. हार्दिक पांड्या गोलंदाजी करत होता. त्याच्या गोलंदाजीचा सामना इमाम करत होता. हार्दिकने ऑफ स्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू फेकला. त्यातच इमामचा घात झाला.

फॉर्मात असल्याच्या आवीर भावात त्रिफाळ्यांच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला इमामने छेडले. बॅक फूट होत चेंडूला फटका मारण्याचा प्रयत्न केला. परंतु चेंडूने बॅटला स्पर्श करत थेट के एल राहुलच्या हातात मुक्काम ठोकला. आणि इमाम बाद झाला. त्याने ३८ चेंडूत ३६ धावा केल्या. दरम्यान, पांड्याला पहिल्याच चेंडूवर चौकार खावा लागला होता. त्याने तो चेंडू आखूड टप्पाच्या टाकला होता. त्यावर इमामने चौकार मारला. पुढचा चेंडू टाकण्यापूर्वी हार्दिकने ब्रेक घेतला आणि बॉलचे चुंबन घेतले आणि जणू काही तो मंत्र जपत असल्याचे अनेकांना दिसलं. त्यानंत त्याने चेंडू टाकला. त्या चेंडूवर इमाम बाद झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bike Air Filter: बाईकचा एअर फिल्टर किती किलोमीटर्सनंतर बदलावा?

Congress Protest Live Update : काँग्रेसच्या आंदोलनावर किरेन रिजिजू यांची टीका; म्हणाले, ‘काँग्रेस दिशाहीन’

Red Saree Designs For Women: महिलांसाठी लाल साड्यांच्या सुंदर डिझाईन्स, 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update: MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! आणखी एका आरोपीला अटक; आतापर्यंत १२ जणांना अटक

Hotel Safety Tips: हॉटेलमध्ये चेक-इन केल्यावर काय काय तपासून घ्यावे? 5 महत्वाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT