क्रिकेट वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील २४ वा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने सर्वात मोठा विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या महाकाय ४०० धावांच्या आव्हान पार करताना नेदरलँडच्या संघ अपयशी ठरला. संपूर्ण संघ फक्त ९० धावा करू शकला. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया संघाचा हा सर्वात मोठा विजय आहे.(Latest News)
४०० धावांचे लक्ष्य पार करताना कोणताही संघ असला तर त्याची काय अवस्था होते हे सर्वांना माहितीये. अशात समोर एक दिग्गज संघ आणि नवखा नेदरलँड क्रिकेट संघ साहाजिकच आपण या सामन्याचा निकाल आधीच लावला असेल. ऑस्ट्रेलियाच्या संघाने दिलेले आव्हान पाहून नेदरलँडचा संघ आधीच मानसिकदृष्ट्या पराभूत झाला होता.(सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा)
नेदरलँडची पहिली विकेट ही २८ धावांवर पडली. त्यानंतर ठराविक अंतराने संघाने आपली विकेट देणं सुरू केलं. अख्या संघातून भारतीय वंशाच्या विक्रमजीत सिंगने सर्वाधिक २५ धावा केल्या. त्याच्यानंतर आलेल्या चार फलंदाजांना १५ धावांचा पल्ला देखील गाठता आला नाही. संपूर्ण संघ २१ षटकात ९० धावा करत बाद झाला.
दरम्यान ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना सर्वाधिक विकेट्स डावखुरा फिरकीपटू अॅडम जम्पा याने घेतल्या. त्याने ४ गडी बाद केलेत. तर मिचेळ मार्शने दोन गडी बाद केलेत. स्टार्क, हॅजलवूड आणि कमिन्सने एक-एक गडी बाद केले.
नेदरलँडची पहिली विकेट ही २८ धावांवर पडली. त्यानंतर ठराविक अंतराने संघाने आपली विकेट देणं सुरू केलं. अध्या संघातून भारतीय वंशाच्या विक्रमजीत सिंगने सर्वाधिक २५ धावा केल्या. त्याच्यानंतर आलेल्या चार फलंदाजांना १५ धावांचा पल्ला देखील गाठता आला नाही. संपूर्ण संघ २१ षटकात ९० धावा करत बाद झाला.
ऑस्ट्रेलियाने ५० षटकात ८ गडी गमावत ३९९ धावा केल्या आणि नेदरलँडच्या क्रिकेट संघाला ४०० धावांचे आव्हान दिले. ऑस्ट्रेलियाकडून डेविड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी नेदरलँडच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. मॅक्सवेलने ४० चेंडूत सर्वात जलद शतक केलं. तर वॉर्नरने १०४ धावा केल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.