virat kohli test comeback century reaction saam tv
Sports

Virat Kohli: विराट टेस्टमध्ये कमबॅक करणार? सेंच्युरीनंतर किंग कोहलीने दिलं अखेर उत्तर

virat kohli test comeback century reaction: भारतीय क्रिकेटचा स्टार खेळाडू विराट कोहलीने नुकतेच शानदार शतक झळकावले. या शतकानंतर चाहत्यांमध्ये एकच चर्चा सुरू झाली होती कोहली पुन्हा टेस्ट क्रिकेटमध्ये जोरदार पुनरागमन करणार का?

Surabhi Jayashree Jagdish

सध्या भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्या वनडे सिरीज खेळवली जातेय. या सिरीजमधील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाच्या चाहत्यांना RO-KO चा उत्तम खेळ पाहायला मिळाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रांची वनडे सामन्यात विराट कोहलीने अप्रतिम फलंदाजी केली. कोहलीने 11 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 120 चेंडूंमध्ये 135 रन्स केले. दरम्यान या सामन्यात टीम इंडियाचा विजय झाला असून विराटला प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्डही देण्यात आला.

निवृत्तीच्या अफवांवर विराटची प्रतिक्रिया

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली निवृत्ती मागे घेऊन पुन्हा टेस्ट क्रिकेट खेळणार अशा चर्चा सुरु होत्या. दरम्यान या सर्व अफवांना विराटने पूर्णविराम दिला आहे. भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट सिरीजमध्ये 0-2 ने पराभव पत्करावा लागला होता, त्यानंतर या चर्चांना जोर आला होता.

दरम्यान कोहलीने स्पष्ट केलंय की, तो भारतासाठी फक्त एका फॉर्मेटमध्येच खेळतोय. विराटने हेही सांगितलं की, जेव्हा तो खेळतो, तेव्हा नेहमी त्याचं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतात.

प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये काय म्हणाला कोहली?

कोहली म्हणाला “आज अशा प्रकारे सामन्यात उतरायला मला खूप छान वाटलं. सुरुवातीचे 20-25 ओव्हर्स पिच चांगलं होतं, त्यानंतर थोडं स्लो झाली. मला वाटलं की, मैदानात जाऊन फक्त चेंडूला हिट करावे, बाकी गोष्टींचा विचार करू नये. बॉल माझ्याकडे येत होता आणि मी खेळाचा आनंद घेत होतो. जेव्हा तुम्हाला सुरुवात मिळते आणि तुम्ही सेट होता, तेव्हा तुम्हाला जाणवतं की, इतक्या वर्षांत तुम्ही काय शिकलात. अनेक वर्षांचा अनुभव कामी येतो आणि तुम्ही परिस्थिती समजून खेळी पुढे नेत जाता.”

मानसिक तयारी आणि फिटनेस

कोहलीने पुढे सांगितलं की “मी जास्त प्रॅक्टिस करण्यावर विश्वास ठेवत नाही. माझा खेळ नेहमी मानसिक राहिलाय. मी रोज शारीरिक मेहनत करतो, ती आता क्रिकेटपेक्षा माझी जीवनशैली झाली आहे. जोपर्यंत माझा फिटनेस आणि खेळाचा आनंद टिकून आहे, तोपर्यंत मला माहिती असतं की मी तयार आहे.”

पुढेही फक्त एकच फॉर्मेट खेळणार कोहली?

या प्रश्नावर कोहलीने स्पष्ट केलं की, “हो, हे असंच राहील. मी फक्त एका फॉर्मेटमध्येच खेळत आहे. मी 300 पेक्षा जास्त वनडे खेळलो आहे आणि 15-16 वर्षांचा अनुभव आहे. जर तुम्ही खेळात असता, सरावादरम्यान बॉल मारत असता, तर तुमचा खेळ चांगला राहतो. तुम्ही दीड-दोन तास सतत नेट्समध्ये फलंदाजी करू शकता, फिटनेस उत्तम असेल आणि मानसिक तयारी असेल, तर सर्व काही आपोआप घडतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा; दोन गटात तुफान हाणामारी

के एल राहुलची शतकी खेळी व्यर्थ; न्यूझीलंडचा भारतावर मोठा विजय

मध्य रेल्वेचा विशेष पॉवरब्लॉक; अनेक लांबपल्ल्याच्या ट्रेनच्या मार्गात बदल, वाचा संपूर्ण वेळापत्रक

बीएमसीतही लाडक्याच किंगमेकर ठरणार? लाडकीच्या हाती, पालिकेची चावी?

ऐन निवडणुकीत राज्यात पैशांचा पाऊस; निवडणूक अधिकाऱ्यांनी २ दिवसांत ९०००००० रुपयांची रोकड पकडली

SCROLL FOR NEXT