team india saam tv
Sports

IND vs AUS: संजू सॅमसनला संधी मिळणार? रोहित कोणाला बसवणार? AUSविरुद्धच्या सामन्यात अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११

IND vs AUS, Team India Playing XI Prediction: सेंट लुसियामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत आज निर्णायक लढत भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. सेमिफायनलमध्ये जाण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी ही लढत करो या मरो लढत असणार आहे. भारतीय संघाने सुपर ८ फेरीतील दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर ऑस्ट्रेलियाला २ पैकी १ सामना जिंकता आला आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या निर्णायक सामन्यात रोहित शर्मा प्लेइंग ११ बदल करणार का? जाणून घ्या.

भारतीय संघाने सुपर ८ फेरीतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये प्लेइंग ११ मध्ये कुठलाच बदल केला नव्हता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात संजू सॅमसनला प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्याची मागणी जोर धरु लागली आहे. सॅमसनला शिवम दुबेच्या जागी संधी देण्याची मागणी केली जात आहे. मात्र बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात निर्णायक वेळी शिवम दुबेने मोठे फटके खेळत संघाला मजबूत स्थितीत पोहोचवलं होतं. या सामन्यात त्याने ३४ धावांची खेळी केली होती. त्यामुळे रोहित शर्मा प्लेइंग ११ मध्ये बदल करण्याची शक्यता खूप कमी आहे.

भारतीय संघाने सुपर ८ फेरीतील पहिल्या सामन्यात बदल केला होता. वेगवान गोलंदज मोहम्मद सिराजच्या जागी कुलदीप यादवला संधी दिली गेली होती. त्यानंतर बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये कुठलाही बदल केला गेला नव्हता. त्यामुळे भारतीय संघ विनिंग कॉम्बिनेशनमध्ये कुठलाही बदल करणार नाही.

यापूर्वी भारतीय संघाचे साखळी फेरीतील सामने न्यूयॉर्कमध्ये खेळले गेले होते. या खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरत होत्या. त्यामुळे रोहितने तीन वेगवान गोलंदाजांना संधी दिली होती. मात्र भारतीय संघाचे पुढील सामने वेस्टइंडिजमध्ये होणार आहेत. या सामन्यांमध्ये रोहितने फिरकी गोलंदाजांना खेळवण्यावर अधिक भर दिला आहे.

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : रखडेलेली सर्व कामे पूर्ण होणार, कामगारांची होणार चांदीच चांदी; वाचा आजचे राशीभविष्य

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

SCROLL FOR NEXT