Rohit Sharma saam tv
Sports

Rohit Sharma: रोहित शर्मा कधी खेळणार? मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून आली नवी अपडेट

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील आजच्या सामन्यापूर्वी रोहित शर्मा खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुखापतीतून तो सावरला असून अंतिम निर्णय मेडिकल टीम घेणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आज चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना रंगणार आहे. दरम्यान, या सामन्यात सर्वांचं लक्ष टीमचा माजी कर्णधार रोहित शर्मा याच्याकडे आहे. या सामन्यात रोहित शर्मा खेळणार की नाही, हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. मुंबई इंडियन्सचा ओपनर रोहित शर्माला हॅमस्ट्रिंगची समस्या झाली होती, ज्यामुळे तो काही सामन्यांमधून बाहेर होता.

यंदाच्या आयपीएलच्या सिझनमध्ये रोहित शर्मा केवळ ४ सामने खेळू शकला आहे. सनरायझर्सविरूद्धच्या गेल्या सामन्यात देखील रोहित शर्माचा टीममध्ये समावेश करण्यात आला नव्हता. मात्र, चेन्नईविरूद्धच्या सामन्यापूर्वी रोहिने नेट्समध्ये फलंदाजी केली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात रोहित शर्मा खेळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबईच्या मुख्य कोचने दिलेली माहिती

चेन्नईविरूद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचे कोच महेला जयवर्धने यांनी सांगितलं की, तो दुखापतीतून सावरला आहे. तो मैदानात पुनरागमन करण्यासाठी बरीच मेहनत घेत आहे. मेडिकल टीम त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. जर तो शारीरिक दृष्ट्या फिट असेल, तर त्या आधारावर आम्ही निर्णय घेणार आहोत. त्याने नेट्समध्ये प्रॅक्टिस केली असून मेडिकल टीम काय निर्णय घेते हे पाहावं लागणार आहे.

कशी आहे मुंबई इंडियन्सची कामगिरी?

आयपीएल २०२४ मध्ये मुंबईची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली टीमने आतापर्यंत ८ सामने खेळले असून त्यामध्ये केवळ २ सामन्यांमध्ये त्यांना विजय मिळवणं शक्य झालं आहे. सध्या गुणतालिकेत टीम ९ व्या स्थानावर आहे.

आजच्या सामन्यासाठी दोन्ही टीम्सची प्लेईंग ११ कशी असणार?

चेन्नई सुपर किंग्ज : संजू सॅमसन (विकेटकीपर), उर्विल पटेल, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), देवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, कार्तिक शर्मा, जेमी ओव्हरटन, अकेल होसेन, नूर अहमद, अंशुल कंबोज, गुर्जपनीत सिंग, मुकेश चौधरी

मुंबई इंडियन्स: विल जॅक्स, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), रॉबिन मिंज, शार्दुल ठाकूर, ट्रेंट बोल्ट, अश्विनी कुमार, जसप्रीत बुमराह, एएम गझनफर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मनसे-ठाकरे गटाचा ४ ऑक्टोबरला संयुक्त मोर्चा

Supreme Court Railway Ticket : ट्रेनमधून पडून मृत्यू झालेल्या व्यक्तींना मिळणार नुकसानभरपाई, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Death News : ८ वेळा आमदार राहिलेल्या ज्येष्ठ नेत्याचे निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Ganesh Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, वीजेचा धक्का लागून ४ जणांचा मृत्यू

Ginger Benefits: सलग ११ दिवस कच्चं आलं खा; वजन कमी होण्यासोबत शरीराला होतील 7 फायदे

SCROLL FOR NEXT