Rain Disrupts RR vs CSK Match in Guwahati, Toss Likely Delayed saam tv
Sports

RR vs CSK Match Rain : राजस्थान-चेन्नई सामन्यात पाऊस ठरला व्हिलन; टॉस उडवण्याआधीच जोरदार एन्ट्री, मॅच रद्द होणार का?

rr vs csk rain delay guwahati toss likely late : राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आज, सोमवारी गुवाहाटीत सामना होत आहे. मात्र, हा सामना सुरू होण्याआधीच पावसानं जोरदार एन्ट्री घेतली आहे. त्यामुळं सामना विलंबाने सुरू होण्याची शक्यता आहे.

Nandkumar Joshi

आयपीएलच्या सुरुवातीच्या दोन सामन्यांत धावांचा पाऊस पडला असला तरी गुवाहाटीत होणाऱ्या तिसऱ्या लढतीआधीच पावसानं 'व्हिलन' बनून एन्ट्री केली आहे. त्यामुळं राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्या लढतीला उशिराने सुरूवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राजस्थान आणि चेन्नई यांच्यात आज, सोमवारी आयपीएलचा तिसरा सामना गुवाहाटीत होणार आहे. भारतीय वेळेनुसार, हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. तर त्याच्या अर्धा तास आधी म्हणजे सात वाजता नाणेफेक होईल. पण गुवाहाटीत होणारा सामना पावसामुळं धुतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा सामना रद्द होण्याची शक्यता कमी असली तरी, नाणेफेक विलंबाने सुरू होईल, असे बोलले जात आहे. सामना सुरू झाला तरी, मध्यंतरीच पाऊस पडण्याची शक्यता आहे.

गुवाहाटीत संध्याकाळी हवामान खराब असणार आहे. संध्याकाळच्या सुमारास पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. नाणेफेकीच्या आधीच पावसानं धमाकेदार एन्ट्री मारली आहे. बीबीसी वेदरनुसार, ५० टक्क्यांहून अधिक पावसाची शक्यता आहे. मध्यरात्रीपर्यंत पावसाची शक्यता अधिक वाढू शकते. विशेष म्हणजे रात्री साडेदहा वाजता सामना जवळजवळ संपतो, त्याचवेळी पावसाची शक्यता साधारणतः ८० टक्के आहे.

आयपीएलमधील लीग स्टेजमधील सामन्यांसाठी राखीव दिवस नाही. गुवाहाटीत जर आज सामन्याचा निकाल लागला नाही, तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक-एक गुण दिला जाणार आहे. दोन्ही संघ कमीत कमी पाच ओव्हर खेळतील, तेव्हाच सामन्याचा निकाल लागू शकतो.

राजस्थान विरुद्ध चेन्नई यांच्यात कुणाचं पारडं जड

राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आज लढत होत आहे. आयपीएलच्या इतिहासात हे दोन्ही संघ ३१ वेळा आमनेसामने आले आहेत. दोघांमध्ये काट्याची लढत बघायला मिळाली आहे. चेन्नईने राजस्थानला १६ वेळा पराभूत केलं आहे. तर राजस्थाननेही चेन्नईला १५ वेळा पराभवाची धूळ चारली आहे. मात्र, गेल्या दहा सामन्यांत मोठा उलटफेर झाल्याचे बघायला मिळाले आहे. राजस्थानने मागील १० सामन्यांत चेन्नईला ८ वेळा पराभूत करण्याची किमया केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Reelstar Death: 'चिमणे, परत ये गं...'; रिलस्टार रोहिणीच्या आत्महत्येनंतर पतीची भावुक पोस्ट, पण नेटकरी संतापले, कारण?

Maharashtra News Live Update: कोल्हापूरात जलशुल्क दरवाढीला सतेज पाटील यांचा विरोध

Accident News : शिर्डी-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू

मोठी बातमी! संतोष देशमुखांच्या सख्ख्या भावावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Paneer Bhurji Recipe: नाश्त्याला चपातीसोबत खा पनीर भुर्जी, वाचा झटपट रेसिपी

SCROLL FOR NEXT