team india saam tv
Sports

WI Vs IND 1st Test, Day 1: पहिल्या दिवशी टीम इंडियाच सरस,अश्विनच्या करामतीनंतर हिटमॅनची - जयस्वालची यशस्वी फटकेबाजी; पाहा Scorecard

WI vs IND 1st Test, Day 1 Highlights: मालिकेतील पहिला कसोटी सामना डॉमिनिकातील विंडसर पार्कच्या मैदानावर सुरू आहे.

Ankush Dhavre

WI vs IND: भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ झाला आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना डॉमिनिकातील विंडसर पार्कच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघ यजमान वेस्टइंडीजवर भारी पडल्याचे दिसून आले आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या वेस्टइंडीजचा पहिला डाव अवघ्या १५० धावांवर संपुष्टात आला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यातून वगळण्यात आलेल्या अश्विनने या डावात ५ गडी बाद केल्या.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या वेस्टइंडीज संघाला चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र लंचपर्यंत वेस्टइंडीजचे ४ फलंदाज तंबूत परतले. त्यानंतर दुसऱ्या सेशनच्या समाप्तीपर्यंत वेस्टइंडीज धावसंख्या ८ गडी बाद १३७ इतकीच होती. याच संधीचा फायदा घेत भारतीय संघाने यजमानांचा डाव अवघ्या १५० धावांवर संपुष्टात आणला.

अश्विनच्या जाळ्यात अडकले वेस्टइंडीजचे फलंदाज..

भारतीय संघाकडून आर अश्विन हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने या डावात ५ गडी बाद केले. यासह रविंद्र जडेजाने ३ तर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी १-१ गडी बाद केला. (Latest sports updates)

रोहित - जयस्वालची यशस्वी भागीदारी..

वेस्टइंडीजचा डाव संपुष्टात आल्यानंतर भारतीय फलंदाज फलंदाजी करण्यासाठी आले होते. भारतीय संघाकडून दमदार सुरुवात पाहायला मिळाली. कर्णधार रोहित शर्मासह पदार्पणवीर यशस्वी जयस्वाल फलंदाजी करण्यासाठी आला होता. पहिल्या दिवसाच्या समाप्तीनंतर दोन्ही फलंदाजांनी मिळून स्कोअरबोर्डवर ८० धावा चढवल्या आहेत. यशस्वी जयस्वाल ४० तर रोहित शर्मा ३० धावांवर नाबाद आहे.

पहिल्या कसोटी सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा, ईशान किशन (यष्टिरक्षक), आर अश्विन, शार्दुल ठाकुर, जयदेव उनाडकट आणि मोहम्मद सिराज.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT