Virat Kohli google
Sports

Virat Kohli: भारताऐवजी लंडनमध्ये राहण्याचा निर्णय का घेतला? विराट कोहलीने स्वतःच केला खुलासा

Why Virat Kohli Staying in London: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली गेल्या काही काळापासून कुटुंबासोबत लंडनमध्ये राहत आहे. भारताऐवजी इंग्लंडमध्ये राहण्याचा निर्णय का घेतला यावर स्वतः विराट कोहलीनेच मौन सोडले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारताचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट आणि टी-२० क्रिकेटमधून अचानक निवृत्तीची घोषणा केली. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहली सात महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्याच वनडे सामन्यात तो शून्यावर बाद झाला. ऑस्ट्रेलिया दौऱ्याला रवाना होण्याआधी कोहली, पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलं वामिका आणि अकाय सोबत बराच काळ लंडनमध्ये राहत होता. भारताऐवजी लंडनमध्ये राहण्याचा निर्णय घेतल्याने कोहलीला ट्रोल देखील करण्यात आले, परंतु लंडनला राहण्याचा निर्णय का घेतला या प्रश्नावर विराट कोहलीने अखेर मौन सोडले आहे.

कोहलीने लंडनला जाण्याचा निर्णय का घेतला?

आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट आणि टी -२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर कोहली आयपीएलमध्ये खेळताना दिसला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलचे विजेतेपद जिंकल्यानंतर, कोहली त्याची पत्नी अनुष्का शर्मासह इंग्लंडला राहायला गेला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्याआधी विराट कोहलीने कॉमेन्टेटर अॅडम गिलख्रिस्ट आणि रवी शास्त्री यांच्याशी विशेष संवाद साधला. या इंटरव्ह्यूमध्ये कोहलीने लंडनला जाण्याच्या निर्णयावर अखेर मौन सोडले.

कोहलीने सांगितले की, कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने त्याला त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवता आला आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करता आले. त्याने असेही म्हटले की गेल्या १५ वर्षांत तो क्रिकेट खेळण्यापासून पूर्णपणे विश्रांती घेऊ शकला नव्हता.

१५ वर्षांत पहिल्यांदाच घेतला मोठा ब्रेक

फॉक्स क्रिकेटवर बोलताना विराट कोहली म्हणाला, हो, मला कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होऊन बराच काळ झाला आहे. यामुळे मला माझ्या आयुष्यात परत कनेक्ट होण्याची संधी मिळाली जे मी इतक्या वर्षापासून करु शकलो नव्हतो. माझ्या मुलांसोबत आणि कुटुंबासोबत घरी वेळ घालवणे खूप छान वाटते आणि मी ते खरोखर एन्जॉय करत आहे. विराट कोहली पुढे म्हणाला, खरं सांगायचं तर, गेल्या १५ ते २० वर्षात मी जितके क्रिकेट खेळलो आहे, त्यात मी क्वचितच मोठा ब्रेक घेतला आहे. जर तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएल एकत्र केले तर, गेल्या १५ वर्षात मी इतर कोणत्याही खेळाडूपेक्षा जास्त सामने खेळलो आहे. त्यामुळे, हा ब्रेक माझ्यासाठी खरोखरच ताजेतवाने करणारा होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mobile: मोबाईल चोरील गेल्यास 'तो' पुन्हा मिळवता येतो, त्वरित करा 'या' गोष्टी

Crime: कौटुंबिक वाद टोकाला भिडला; रागच्या भरात पत्नीचा गळा आवळला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दिवाळीसाठी गावी जाणाऱ्यांची गर्दी, रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची दीड किलोमीटर लांब रांग; Video

ओबीसी मेळाव्यातून पंकजा मुंडे टार्गेट? गोपीनाथ मुंडेंचा वारसा धनंजय मुंडेंना देण्याची भाषा

Voter List Scam: मतदारयांद्यामधील घोळावरुन विरोधक बरसले, निवडणूक आयोगाविरोधात 1 नोव्हेंबरला मोर्चा

SCROLL FOR NEXT