rohit sharma twitter
Sports

IND vs AUS: अक्षर, कुलदीप असताना तनुषची निवड का? कर्णधार रोहितने सांगितलं कारण

Rohit Sharma On Tanush Kotian: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील चौथ्या कसोटीसाठी तनुष कोटियानचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

Ankush Dhavre

बॉर्डर- गावसकर ट्रॉफी मालिका सध्या रोमांचक वळणावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामने झाले असून ही मालिका १-१ ने बरोबरीत आहे. तर मालिकेतील १ सामना ड्रॉ राहिला आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर रंगणार आहे.

मालिकेतील उर्वरीत २ कसोटी सामन्यांसाठी मुंबईचा युवा खेळाडू तनुष कोटीयानला भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. मात्र अक्षर पटेल आणि कुलदीप यादवसारखे अनुभवी गोलंदाज असताना, युवा तनुष कोटियानला संधी का देण्यात आली? असा प्रश्न उपस्थित होत असताना, रोहितने या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

काय आहे कारण

तनुष कोटियानला संघात स्थान का दिलं? या प्रश्नाचं उत्तर देताना रोहित म्हणाला, 'तनुषला ऑस्ट्रेलियात खेळण्याचा अनुभव आहे. कुलदीपबद्दल सांगायचं झालं, त्याच्याकडे व्हिजा नाहीये आणि तो १०० टक्के फिट सुद्धा नाहीये. अक्षरच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालंय. तनुष तयार आहे..आणि आम्हाला बॅकअप फिरकीपटूची गरज होती. सिडनीमध्ये आम्हाला त्याची गरज भासू शकते. तनुष काय करु शकतो, हे त्याने दाखवून दिलं आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना झाल्यानंतर आर अश्विनने पत्रकार परिषद घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. गेली १४ वर्ष भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अश्निनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला. अश्विनने निवृत्ती घेतल्यानंतर, तो मायदेशी परतला आहे. म्हणून भारतीय संघाला त्याची रिप्लेसमेंट हवी होती.

तनुष कोटियानने गेल्या दिड वर्षात देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करुन दाखविली आहे. त्याच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ३३ सामन्यांमधील ४७ डावात ४१.२१ च्या सरासरीने १५२५ धावा केल्या आहेत.

यादरम्यान गोलंदाजी करताना त्याने १०१ गडी बाद केले आहेत. फलंदाजी करताना त्याने २ शतक आणि १३ अर्धशतकं झळकावली आहेत. आता तनुषला भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये संधी मिळणार का? संधी मिळाल्यास तो कशी कामगिरी करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्ह्यात वाळू वाहतूकदार संघटना आक्रमक

चटकदार अन् भरपेट! अंबाडीच्या पानांच्या बनवा पातोड्या; सोपी स्टेप बाय स्टेप रेसिपी लगेचच करा नोट

आषाढी वारीसाठी सरकारचं मोठं गिफ्ट! वारकऱ्यांसाठी 5500 ST बसेस, कोणत्या मार्गावरून धावणार?

International Yoga Day : योगा करण्यापूर्वी चुकूनही करू नका ‘ही’ ५ कामे, निष्काळजीपणा पडेल महागात

ठाकरेंचे खासदार शिंदेंकडे का गेले? राज ठाकरेंनी सांगितलं अमित शहा यांचं कनेक्शन

SCROLL FOR NEXT