Suryakumar Yadav, Shreyas Iyer, ajit Agarkar saam tv
Sports

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरून का हटवलं?; अजित आगरकरनं सांगितलं नेमकं कारण

why suryakumar yadav was removed as india t20 captain : आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासह एशियन गेम्ससाठी भारतीय संघाची घोषणा झाली. सूर्यकुमार यादवला टी २० संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आलं. याशिवाय त्याला संघातूनही डच्चू दिला. निवड समिती प्रमुख अजित आगरकर यानं यामागील नेमकं कारण सांगितलं.

Nandkumar Joshi

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयनं शनिवार, ६ जून रोजी आयर्लंड, इंग्लंड आणि एशियन गेम्ससाठी भारतीय संघाची घोषणा केली. सूर्यकुमार यादवला भारतीय टी २० संघाच्या कर्णधारपदावरून हटवलं, याशिवाय त्याला संघातूनही डच्चू दिला. निवड समिती प्रमुख अजित आगरकर यानं संघाची घोषणा करतानाच, नव्या कर्णधाराची घोषणाही केली. श्रेयस अय्यरची टी २० संघाचा कर्णधार म्हणून निवड केल्याचे अधिकृतपणे जाहीर केले. सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरून हटवलं, तसेच संघातूनही का वगळण्यात आले, याचे कारणही सांगितले. हा निर्णय घेणे सोपे नव्हते, अशी कबुलीही आगरकरने दिली.

भारतीय संघाची घोषणा केल्यानंतर अजित आगरकरने घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरून हटवलं. संघातूनही डच्चू देण्यात आला. तसेच श्रेयस अय्यरला कर्णधार करण्यामागची कारणेही सांगितली. सूर्यकुमारच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा निर्णय घेणे आमच्यासाठी इतके सोपे नव्हते. पण सध्याचा त्याचा फॉर्म हे सर्वात मोठे कारण आहे, असे आगरकर म्हणाला.

गेल्या काही वर्षांत श्रेयस अय्यरनं कर्णधारपद उत्कृष्टरित्या सांभाळल्याचं आम्ही जवळून बघितलं आहे. त्याने वेगवेगळ्या संघांचे उत्कृष्ट नेतृत्व केलं आहे. कर्णधार म्हणून त्याची वैयक्तिक कामगिरीही चांगली राहिली आहे. श्रेयसला वर्ल्डकप स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात स्थान मिळणार होतं, त्याचं नाव आघाडीवर होतं. माझ्या दृष्टीने तो कर्णधारपदासाठी सर्वात प्रबळ दावेदारांमध्ये एक होता, असंही आगरकर म्हणाला.

पुढील टी २० वर्ल्डकप स्पर्धा २०२८ मध्ये होणार आहे. यजमानपद संयुक्तपणे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडकडे आहे. आम्ही ही दोन वर्षे लक्षात घेऊन पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयामागे हेही एक मोठे कारण आहे. श्रेयस अय्यरची कर्णधार म्हणून निवड केली असून, तिलक वर्माला उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. युवा स्टार क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीला संघात स्थान देण्यात आले आहे.

संघातून वगळल्यानंतर सूर्यकुमारची ११ शब्दांची पोस्ट

सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर संघातूनही डच्चू देण्यात आला आहे. बीसीसीआयच्या या निर्णयानंतर सूर्यकुमारने सोशल मीडियावर पोस्टद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय संघाची नावे असलेली पोस्ट शेअर केली असून, या टॅलेंटेड ग्रुपला आगामी आव्हानांसाठी शुभेच्छा, अशी कॅप्शन दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Ireland 1st T20I: भारताचा आयर्लंडकडून पहिल्यांदाच पराभव, 'या' ५ कारणामुळे सामन्यासह टीम इंडियानं गमवाली टी-२० मालिका

महसुलात 20 हजार कोटींचा घोटाळा? मुद्रांक शुल्कावर अधिकाऱ्यांचा डल्ला

Beijing Plane Crash: सर्वात उंच इमारतीला विमान धडकलं; थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

लोहगड हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, सिया-चेतनचं प्रेम, खुनानंतर ब्लेम गेम, केतनला टक्कल, नात्यात दुराव्याचं कारण?

Maharashtra News Live Update: यवतमाळ शहरात मुसळधार पावसाला सुरूवात

SCROLL FOR NEXT