rohit sharma saam tv
Sports

IND vs WI: ..म्हणून रोहितने थेट बॅटिंग ऑर्डरच बदलली! सामन्यानंतर केला मोठा खुलासा

Rohit Sharma Statement: सामना झाल्यानंतर त्याने यामागचं कारण सांगितलं आहे.

Ankush Dhavre

IND vs WI 1st ODI: कसोटी मालिकेत दमदार कामगिरी केल्यानंतर आता वनडे मालिकेला सुरुवात झाली आहे. भारत विरुद्ध वेस्टइंडीज यांच्यातील पहिला वनडे सामना गुरुवारी (२७ जुलै) बार्बाडोसच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी कामगिरी करत ५ गडी राखून विजय मिळवला आहे.

या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नवीन प्रयोग करून पाहिला. त्याने भारतीय संघाचा फलंदाजी क्रम बदलला होता. दरम्यान सामना झाल्यानंतर त्याने यामागचं कारण सांगितलं आहे.

सामना झाल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की, ' मला वाटलच नव्हतं की खेळपट्टी अशी असेल. प्रथम गोलंदाजी करणं संघासाठी महत्वाचं होतं. खेळपट्टीवर फिरकी गोलंदाज आणि वेगवान गोलंदाजांसाठी मदत उपलब्ध होती. आमच्या गोलंदाजांनी त्यांना कमी धावांवर रोखलं आणि दमदार कामगिरी केली.'

तसेच फलंदाजी क्रमात बदल करण्याबाबत बोलताना तो म्हणाला की, ' आम्ही वनडे खेळण्यासाठी आलेल्या खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्नात आहे. जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा आम्ही असे प्रयोग करू. त्यांना ११५ धावांवर रोखल्यानंतर आम्हाला माहीत होतं की, आम्ही त्यांना संधी देऊ शकतो.' (Latest sports updates)

मुकेश कुमारचं केलं कौतुक..

मुकेश कुमार बाबत बोलताना तो म्हणाला की, ' तो खरंच अप्रतिम होता. तो भन्नाट गतीने चेंडू स्विंग करू शकतो. परिस्थिती कशी ही असली तरी आम्हाला त्यांना थांबवण्यासाठी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्याची गरज आहे. आमच्या गोलंदाजांनी खरच चांगली कामगिरी केली. त्यानंतर ईशानने देखील अप्रतिम फलंदाजी केली.'

भारतीय संघाचा जोरदार विजय..

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय गोलंदाजांनी वेस्टइंडीज संघाचा डाव अवघ्या ११४ धावांवर रोखला. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून ईशान किशनने सर्वाधिक ५२ धावांची खेळी करत भारतीय संघाला ५ गडी राखून विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : जन्मदाता बाप बनला हत्यारा; सरपंचपदाचा हव्यास, पोटच्या मुलीची हत्या

मोठी बातमी! मुंबई विमानतळावर Air India आणि इंडिगो विमानाच्या पंखांची टक्कर

मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, नेमकं काय घडलं? VIDEO

मुंबई पोलिसांवर जीवघेणा हल्ला; तलवार, हॉकी, फायटर पंचने मारहाण, परिसरात खळबळ

Maharashtra Live News Update: अमरावतीच्या एमआयडीसी परिसरात फॅक्टरीला भीषण आग

SCROLL FOR NEXT