ruturaj gaikwad saam tv
Sports

Ruturaj Gaikwad Marriage: ठरलं तर! पवारांची लेक होणार गायकवाडांची सून?, ऋतूराजच्या पत्नीचं खरं नाव आलं समोर

Ruturaj Gaikwad Wife: अंतिम सामना सुरु होण्यापूर्वी तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.

Ankush Dhavre

Who Is Utkarsha Pawar: आयपीएल २०२३ स्पर्धा शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाला अंतिम सामन्यात पोहचवण्यात ऋतुराज गायकवाडने मोलाची भूमिका बजावली आहे.

डावाची सुरुवात करताना संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. आता अंतिम सामन्यातही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. दरम्यान अंतिम सामना सुरु होण्यापूर्वी तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. (Who Is Utkarsha Pawar)

आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना सुरु होण्यापूर्वी ऋतुराज गायकवाडने त्याच्या फॅन्सना आनंदाची बातमी दिली आहे. चेन्नईचा स्टार ऋतुराज गायकवाड लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण येत आहे. येत्या ३-४ जूनला ऋतुराज गायकवाडचा विवाह होणार असल्याची चर्चा सुरु आहे. आता त्याच्या होणाऱ्या पत्नीचे नाव समोर आले आहे.

ऋतुराज गायकवाड विवाह बंधनात अडकणार असल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली. आता ही बातमी पसरल्यानंतर ऋतुराज गायकवाडची होणारी बायको आहे तरी कोण? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. इन्साईड स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार,ऋतुराज गायकवाडच्या होणाऱ्या पत्नीचं नाव उत्कर्षा पवार असं आहे. (Latest sports updates)

ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार हे दोघेही एकमेकांना इंस्टाग्रामवर फॉलो करतात. दोघेही एकमेकांना बऱ्याच वर्षांपासून ओळखतात. अनेकदा ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार हे एकत्र जिम करताना देखील दिसून आले आहेत. दोघांनी सोशल मीडियावर फोटो देखील शेअर केला होता. हे फोटो पाहून दोघांमध्ये अफेअर असल्याचा चर्चा सुरु झाल्या होत्या.

ऋतुराज गायकवाड जेव्हा चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी ५० वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. त्या सामन्यात त्याने ७७ धावांची खेळी केली होती. या सामन्यात चेन्नईने विजय मिळवला होता. या सामन्यानंतर त्याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो शेअर केले होते.

शेअर केलेल्या फोटोमध्ये डेवोन कॉनव्हेची पत्नी किमसह आणखी एक मुलगी असल्याचं दिसून येत आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाची जर्सी घातलेली ही मुलगी उत्कर्षा असल्याचे दिसून येत आहे. त्याने तिला या पोस्टमध्ये टॅग केलं आहे.

लवकरच अडकणार विवाह बंधनात?

आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना झाल्यानंतर आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना सुरु होण्यापूर्वी ऋतुराज गायकवाड विवाह बंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे ऋतुराज गायकवाडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यातून माघार घेतली आहे. तर त्याच्या ऐवजी यशस्वी जयस्वालला राखीव खेळाडू म्हणून भारतीय संघात स्थान दिलं गेलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अजितदादांच्या अपघात आणि घातपात मागे असलेल्यांना वाचवणारा नेता कोण? मफलरवाल्या पोस्टरने राजकारण तापलं!

Assam Kaziranga Accident: डोळ्यांच्या पापण्या लवते न लवते तोच अनर्थ घडला! भरधाव ट्रॅव्हलर थेट कंटेनर ट्रकवर आदळला; २४ जणांचा मृत्यू

Saturday Horoscope: या 3 राशींना मिळणार आनंदाची बातमी, तर काहींनी पैशांच्या बाबतीत राहावं सावध!

छठ पूजेविरोधात ठाकरे मैदानात; 'यूपी निवडणुकीसाठी छठ पूजेच्या वादाचा घाट

संजय शिरसाटांच्या घरावर बाटलीफेक; पोलीस प्रशासनाच्या कारभारवर शिरसाट संतप्त

SCROLL FOR NEXT