Who Is Nitish Kumar Reddy ESPN
Sports

Ind Vs Aus Test Match: कोण आहे नितीश रेड्डी? मेलबर्नमधील दमदार खेळीनंतर ज्यानं साऱ्या जगाला केलं आश्चर्यचकित

Who Is Nitish Kumar Reddy: टीम इंडियाचा ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डीने मेलबर्न क्रिकेट मैदानात शतक ठोकत सर्व जगाला आश्चर्यचकित केलं.

Bharat Jadhav

मेलबर्नच्या मैदानात शतक ठोकल्यानंतर टीम इंडियाचा ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डीकडे अख्या जगाचं लक्ष गेलं. शतक ठोकल्यानंतर सारं जग आश्चर्यचकित झालं. ऑस्ट्रेलिया विरुद्धात मेलबर्नमध्ये खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी नितीश रेड्डीने भारताचा डाव सावरत आपल्या क्रिकेट करिअरमधील पहिलं शतक केलं.

नितीश रेड्डी १७६ चेंडूत १०५ धावा करत नाबाद राहिला. नितीश रेड्डीने या खेळीत त्याने १ षटकार आणि १० चौकार मारलेत. नितीश रेड्डीवर प्रशिक्षक गौतम गंभीरचा खूप मोठा विश्वास आहे. रेड्डीने गंभीरचा विश्वास सार्थ केला. गंभीरने विश्वास ठेवत रेड्डीला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यातील कसोटीत संधी दिली. या २१ वर्षाच्या ऑलराउंडरला या दौऱ्यासाठी संधी देण्यात आली तेव्हा अनेकांनी प्रश्न केले होते.

अनुभवी खेळाडूंना सोडून नितीश रेड्डीला का घेतलं असा प्रश्न अनेकजण विचारत होते. तर काही जण म्हणत होते की, विराट कोहली आणि ऋषभ पंतला बाहेर ठेवण्यासाठी नितीश रेड्डीला घेतलं असावं, असं म्हटलं जात होतं. पण संधीचं सोनं करत नितीश रेड्डीने शतक ठोकलं आणि सर्वांची मने जिंकली.

कोण आहे नितीश रेड्डी

नितीश रेड्डी याचा जन्म आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम शहरात झालाय. आयपीएलमध्ये नितीश रेड्डी सनराझजर्स हैदराबादकडून सामना खेळतो.

आयपीएल २०२३ च्या लिलावात सनराझजर्स हैदराबादने नितीश रेड्डीला २० लाख रुपयांच्या बेस प्राइसवर खरेदी केलं होतं. नितीश रेड्डी एक ऑलराउंडर आहे. रेड्डी संघाच्या अखेरच्या फळीत फलंदाजीला येत फटकेबाजी करणारा फलंदाज आहे. इतकेच नाही तर तो जलद गतीने फलंदाजी सुद्धा करतो. नितीश रेड्डी आंध्रप्रदेशसाठी डोमेस्टिक क्रिकेट खेळतो. नितीश रेड्डीने २६ प्रथम श्रेणी सामन्यात ९५८ धावा केल्या आहेत. तर ५९ विकेट घेतल्या आहेत.

तर अ गटाच्या सामन्यात रेड्डीने ४०३ धावा केल्यात तर १४ विकेट घेतल्यात. ऑव्हरऑल टी२० सामन्यात त्याने ६ विकेट घेतल्यात तर ४८५ धावा केल्या आहेत. नितीश रेड्डीला एक यशस्वी क्रिकेटर बनवण्यासाठी त्याचे वडील मृत्याला रेड्डी यांचं मोठं योगदान आहे. नितीश वडिलांची मेहनतच आहे जी त्याला यश मिळवण्यासाठी प्रोत्साहन देत असते. नितीश रेड्डी याच्या लहानपणीचे प्रशिक्षक कुमार स्वामी हे नितीशला सहा वर्षापासून ओळखतात.

ते म्हणतात, नितीश रेड्डीला चांगला क्रिकेट बनवण्यासाठी त्याच्या वडिलांचा मोठं योगदान आहे. नितीश रेड्डी वयाच्या पाचव्या वर्षापासून क्रिकेट खेळत आहे. हिंदुस्तान झिंक मैदानावर मोठ्या खेळाडूंचे सामने पाहण्यासाठी जात असायचा. नितीश रेड्डीने सुरुवातीला कुमार स्वामी, कृष्ण राव आणि वाटेकर या प्रशिक्षकांच्या हाताखाली प्रशिक्षण घेतले.

शतक होताच बापाला आलं रडू

मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी नितीश रेड्डीने शानदार शतक झळकावलं. मुलाने केलेलं शतक पाहून वडिलांना रडू कोसळलं. नितीश एक क्रिकेट बनवण्यासाठी त्याच्या वडिलांनी उदयपूर येथे बदली झाल्यानंतर नोकरी सोडली. नितीश रेड्डी फलंदाजी करत असताना त्याचे वडील प्रेक्षकाच्या स्टॅण्डमध्ये बसलेले होते.

नितीश रेड्डी हा शतकाच्या जवळ होता तेव्हा वडील देवाची प्रार्थना करत होते. कारण या मैदानावर काही खेळाडू शतक करू शकले नाहीत. जेव्हा नितीश रेड्डीने शतक पूर्ण केलं तेव्हा त्याच्या वडिलांच्या अश्रू आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर जोरदार पाऊस, भिडे पूल पाण्याखाली

Aare Ware Beach : पावसाळ्यात 'आरे-वारे' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडकविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

SCROLL FOR NEXT