manu bhaker saam tv news
Sports

Who Is Manu Bhaker: मनू है तो मुमकीन है.. भारताला २ पदकं जिंकून देणारी मनू भाकर आहे तरी कोण?

Who is Manu Bhakar who won 2 medals for India in Olympic Games: मनू भाकरने भारताला आतापर्यंत २ पदकं जिंकून दिली आहेत. दरम्यान मनू भाकर आहे तरी कोण? जाणून घ्या.

Ankush Dhavre

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी दमदार सुरुवात केली आहे. पॅरिसमधून कोट्यावधी भारतीयांची मान अभिमानाने उंचावणारी बातमी समोर आली आहे. मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी भारताला या स्पर्धेतील दुसरं पदक जिंकून दिलं आहे. १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात मनू भाकर आणि सरबज्योत सिंग या जोडीने कांस्य पदकावर निशाणा साधला आहे. (Who Is Manu Bhaker)

मनू भाकरने रचला इतिहास

या स्पर्धेत मनू भाकरकडून चमकदार कामगिरी पाहायला मिळाली आहे. भारताकडून या स्पर्धेत ११७ खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. दरम्यान मनू भाकर ही एकमेव अशी खेळाडू आहे जिने भारताला २ पदकं मिळवून दिली आहेत. यापूर्वी देखील तिने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारताला कांस्य पदक जिंकून दिलं होतं. दरम्यान एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत २ पदकं मिळवून देणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे. गेल्या १२४ वर्षांच्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात हा कारनामा कुठल्याच खेळाडूला करता आला नव्हता. त्यामुळे तिचं नाव भारतीय ऑलिम्पिकच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं गेलं आहे.

मनू भाकर आहे तरी कोण?

मनू भाकरबद्दल बोलायचं झालं तर, ती हरियाणातील झज्जरमधील गोरिया गावात राहते. मनूचे वडील राम किशन भाकर हे नेव्हीमध्ये कार्यरत आहेत. शूटिंगमध्ये आपला ठसा उमटविणाऱ्या मनूने थांग टा आणि कराटे या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय पदक जिंकलं आहे. यासह स्केतींगमध्येही तिने पदक मिळवलं आहे.

इतर खेळांमध्ये पदक जिंकणारी मनू शूटिंगमध्ये कशी आली? असा प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल ना? एकदा ती आपल्या वडीलांसह शूटिंग रेंजमध्ये फेरफटका मारत होती. त्यावेळी तिने १० नंबरवर निशाणा साधला. वडीलांना जाणवलं की, ही शूटिंगमध्येही काहीतरी करु शकते. त्यावेळी वडिलांनी तिला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी तिने राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकलं.

मनूने उघडून दिलं पदकांचं खातं

भारताला पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतील पहिल्या दिवशी एकही पदक जिंकता आलं नव्हतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मनूने कांस्य पदकावर निशाणा साधला. हे तिचं ऑलिम्पिक स्पर्धेतील पहिलं पदक ठरलं. स्पर्धेतील तिसऱ्या दिवशीही भारतीय खेळाडूंना पदकाच्या तालिकेत भर घालण्याची संधी होती. मात्र ३ प्रकारात भारताचं पदक हुकलं. आतापर्यंत पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत भारताने २ पदकं जिंकली आहेत. ही संख्या आणखी वाढेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT