मुंबई : महिला बॉक्सर निखात झरीनने (Nikhat Zareen) महिला वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपध्ये इतिहास रचला आहे. तिने गुरुवारी झालेल्या बॉक्सिंग फायनल मध्ये ५२ किलो वजनी गटात थायलंडच्या जितपॉन्ग जुटामासचा पराभव करत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे. २५ वर्षीय निखात झरीन ही जागतिक बॉक्सिंग मध्ये (Boxing) भारताला सुवर्णपदक मिळवून देणारी पाचवी भारतीय महिला ठरली आहे.
बॉक्सिंगमधील दिग्गज खेळाडू असणाऱ्या मेरी कोमने या ६ वेळा सुवर्ण पदक जिंकून आपल्या नावावर रेकॉर्ड केला आहे. तर याबॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये मेरी कोम, निखात झरीन यांच्याशिवाय सरिता देवी, जेनी आरएल, आणि लेखा यांनी देखील सुवर्ण पदक मिळवलं आहे.
निखातचा जन्म १४ जून १९९६ मध्ये तेलंगणामधे झाला असून ती १३ वर्षांची असल्यापासून बॉक्सिंग खेळते. तसंच तिची मेरी कोमसोबत तिची अनेक वेळा लढत झाली आहे. तर भारतीय बॉक्सिंग फेडरेशनने मेरी कोमला टोकीयो ऑलिंपिक स्पर्धेसाठी ट्रायल न घेताच ५१ किलो वजनी गटाच्या वर्गासाठी ज्यावेळी सिलेक्ट केलं होतं. त्यावेळी निखातने या विरोधात आवाज उठवत क्रिडा मंत्री किरण रिजीजू यांना पत्र लिहलं होतं.
दरम्यान, या सर्व वाद विवादानंतर मेरी कोमची (Mary Kom) ट्रायल झाली आणि तिची लढत निखात सोबत लावण्यात आली. मात्र, या दोघींमध्ये एवढा टोकाचा वाद होता की, या लढतीनंतर विजयी झालेल्या मेरी कोमने निखातशी हात देखील मिळवणं टाळलं होतं. निखातने तिच्या करियरमधील पहिलं मेडल २०१० मध्ये मिळवलं होतं. तर वयाच्या १५ व्या वर्षी तिने देशाला इंटरनॅशनल गोल्ड मेडल मिळवून दिलं होत.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.