Hair Spa का महत्त्वाचा आहे? Spa केल्यानंतर या 5 गोष्टी लक्षात ठेवा...

हेअर स्पा हा केसांच्या उपचारांचा एक प्रकार आहे. ज्यामध्ये तुमच्या केसांना शॅम्पू, हेअर क्रीम आणि हेअर मास्क आणि कंडिशनर इत्यादी लावून वाफ दिली जाते.
Hair Spa tips in Marathi, benefits of hair spa in Marathi
Hair Spa tips in Marathi, benefits of hair spa in MarathiSaam Tv

हेअर स्पा (Hair Spa) हा केसांच्या उपचारांचा एक प्रकार आहे. ज्यामध्ये तुमच्या केसांना शॅम्पू, हेअर क्रीम आणि हेअर मास्क आणि कंडिशनर इत्यादी लावून वाफ दिली जाते. या संपूर्ण प्रक्रियेसह केसांची छिद्रे उघडण्याचे काम केले जाते. हेअर स्पा तुमचे केस पुनरुज्जीवित करण्याचे काम करते. हे तुमचे खराब झालेले केस दुरुस्त करते आणि केसांना मऊ बनवून त्यात चमक आणते. हेअर स्पा केल्यानंतर तुमच्या केसांची चांगली वाढ होते. केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी महिन्यातून एकदा किंवा दोनदा हेअर स्पा करणे आवश्यक आहे, असे बहुतेक सौंदर्यतज्ज्ञांचे मत आहे. पण ते करून घेतल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेतली तरच हेअर स्पाचा पुरेपूर फायदा मिळू शकतो. स्पा केल्यानंतर कोणती काळजी घेणे आवश्यक आहे ते जाणून घ्या. (Hair Spa Benefits in Marathi)

Hair Spa tips in Marathi, benefits of hair spa in Marathi
मैत्रीणच बनली वैरी! सोशल मीडियावर शेअर केले अश्लील व्हिडीओ

हेअर स्पा केल्यानंतर या गोष्टी लक्षात ठेवा-

स्पा महिन्यातून दोनपेक्षा जास्त करू नका;

साधारणतः महिन्यातून एकदा स्पा करणे पुरेसे असते, परंतु जर तुमचे केस खूप कोरडे आणि खराब झाले असतील तर तुम्ही 15 दिवसांच्या अंतराने स्पा करू शकता. स्पा महिन्यातून दोन पेक्षा जास्त करू नये. जास्त प्रमाणात हेअर स्पा केल्याने डोक्याचा टाळू कोरडा होऊ शकतो.

हेअर स्टाइलिंग टूल्स टाळा;

हेअर स्पा केल्यानंतर स्ट्रेटनर, कर्लर्स, ब्लो ड्राय इत्यादी हेअर स्टाइलिंग टूल्स वापरणे कटाक्षाने टाळा. यामुळे केसांना मिळणारे पोषण लगेच संपते. किमान आठवडाभर या गोष्टींचा वापर करू नका.

हे देखील पाहा-

केस धुवू नका;

हेअर स्पामध्ये तुमच्या केसांमध्ये डीप कंडिशनिंग केले जाते. त्यामुळे स्पा केल्यानंतर एक किंवा दोन दिवस केस अजिबात धुवू नका. तसेच लगेच येऊन आंघोळ करू नका. केस कधी धुवावेत याविषयी सौंदर्य तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल. जेव्हा तुम्ही शॅम्पू वापरता तेव्हा शॅम्पू पाण्यात मिसळून लावा. यामुळे तुमच्या केसांची चमक कायम राहते.

कंडिशनर वापरा;

जेव्हा तुम्ही तुमचे केस धुता तेव्हा नियमित कंडिशनर वापरण्यास विसरू नका. कंडिशनर तुमचे केस मऊ बनवते, तसेच स्पाचा इफेक्ट जास्त काळ टिकण्यासाठी कंडिशनर उपयुक्त मानला जातो. तसेच केस धुतल्यानंतर हलक्या ओल्या केसांवरही सीरमचा वापर करा.

केसांना धुळीपासून वाचवा;

हेअर स्पा केल्यानंतर केसांना बाहेरच्या धुळीपासून सुरक्षित ठेवा. यासाठी जेव्हाही तुम्ही घराबाहेर जाचाल तेव्हा केस कपड्याने झाका.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com