Sachin Tendulkar advises biker to wear helmet saam tv
Sports

Sachin Tendulkar: हेल्मेट कुठे आहे? पुण्याच्या रस्त्यावर अचानक सचिन प्रकटला, नेमकं काय घडलं? VIDEO

Sachin Tendulkar advises biker to wear helmet: पुण्यातील टिळक रोडवर सचिन तेंडुलकर यांनी हेल्मेट न घातलेल्या तरुणाला प्रेमाने समज देत “गाडी सावकाश चालव” असा सल्ला दिला. हा भावनिक क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाला असून रोड सेफ्टीबाबतचा महत्त्वाचा संदेशही देऊन गेला.

Surabhi Jayashree Jagdish

सचिन तेंडुलकरला भेटणं ही अनेकांचं स्वप्न असतं. कदाचित तुमचंही असं स्वप्न असेल..तर समजा रस्त्याने जात असताना बाजूच्या गाडीतून तुम्हाला कोणीतरी आवाज दिला आणि तो व्यक्ती सचिन तेंडुलकर असेल तर...आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? पण असं खरंच पुण्यातील एका तरूणासोबत घडलंय.

पुण्यातील टिळक रोडवर घडलेला एक मनाला भिडणारा प्रसंग सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने एका बाईकवर असलेल्या तरूणाला छोटासा सल्ला अनेकांच्या मनाला स्पर्श करून गेलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील टिळक रोडवरून एक तरुण दुचाकीवरून जात होता. त्यावेळी एका कारमधून अचानक त्याला आवाज आला, “हेल्मेट कुठे आहे?” सुरुवातीला त्या तरुणाला नेमकं काय झालं हे समजलं नाही. त्याने मागे वळून पाहिलं तर गाडीत स्वतः सचिन तेंडुलकर बसलेला होता.

सचिनला पाहताच तरूण झाला थक्क

सचिनला अचानक समोर पाहून तो तरुण काही क्षण थक्कच झाला. मात्र सचिनने कुठलाही मोठेपणा न दाखवता अगदी घरातील ज्येष्ठ व्यक्ती जशी प्रेमाने समजावते, तशाच सुरात त्या तरुणाला सांगितलं, “हेल्मेट नाही? गाडी सावकाश चालव…” एवढं बोलून त्याची गाडी पुढे निघून गेली.

मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला क्षण

या घटनेचा व्हिडिओ त्या तरुणाने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे. त्या तरुणासाठी हा क्षण आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला. त्याला आवडत्या क्रिकेटपटूसोबत सेल्फी मिळाला, ही गोष्ट वेगळीच, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे सचिन यांनी दिलेला प्रेमळ सल्ला त्याच्या मनात कायमचा कोरला गेला.

तरूणाने सांगितला अनुभव

सचिनने सल्ला दिलेल्या तरूणाचं नाव सोहम आहे. या घटनेनंतर सोहमने त्याच्या अनुभवाबद्दल सांगितलंय. तो म्हणाला की, ज्यावेळी मला क्रिकेटचा देवा मला भेटला तेव्हा तो क्षण माझ्यासाठी आनंददायी होता. सचिनसोबत सेल्फी घेणं हे माझ्यासाठी कोणत्या स्वप्नापेक्षा कमी नव्हतं. त्यांनी मला स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला दिला. त्यांनी जे सांगितलं त्यामध्ये एक वेगळीच माया होती.

सोहम पुढे म्हणाला की, आता मी नियमितपणे हेल्मेट घालणार आहे. या तरूणाचा आणि सचिनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

Kangana Ranaut: महिलांच्या कर्तृत्वापेक्षा त्यांच्या चारित्र्याचीच चर्चा का? कंगना रणौतचा थेट सवाल

Blackhead Removal Home Remedies: ब्लॅकहेड्समुळे चेहरा दिसतोय खराब? 'हे' ५ उपाय करा; मिळेल नॅचरल सॉफ्ट फेस

SCROLL FOR NEXT