When and where to watch india vs australia world cup match know match details in marathi world cup  Saam tv news
Sports

India vs Australia: कधी अन् कुठे रंगणार भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्डकपचा सामना? इथे पाहू शकता फ्री

India vs Australia, World Cup 2023 Match Details: जाणून घ्या या सामन्याबद्दल सर्वकाही.

Ankush Dhavre

India vs Australia, World Cup 2023 Match Details:

वर्ल्डकप स्पर्धेत आतापर्यंत २ सामने खेळले गेले आहेत. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने गतविजेत्या इंग्लंडवर विजय मिळवला आहे. तर पाकिस्तानने नेदरलँडला धुळ चारत विजयी सलामी दिली आहे.

तर भारतीय संघाचा पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध रंगणार आहे. या रोमांचक सामन्याची सर्वच क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान हा सामना कधी, कुठे आणि किती वाजता सुरू होईल, जाणून घ्या.

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये खेळवला जाणारा हा सामना ८ ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजता सुरू होईल.

हा सामना जर तुम्हाला टीव्हीवर पाहायचा असेल, तर तुम्हाला स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह पाहता येईल. तसेच स्टार स्पोर्ट्स १,स्टार स्पोर्ट्स हिंदीवर देखील तुम्ही या सामन्याचा आनंद घेऊ शकता.

फ्रीमध्ये कुठे पाहता येईल?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या सामन्याचा आनंद तुम्ही मोबाईलवरही घेऊ शकता. यासाठी तुम्हाला डिस्नी प्लस हॉटस्टार ॲप डाऊनलोड करावं लागेल. या ॲपवर संपूर्ण वर्ल्डकप स्पर्धा तुम्हाला एकही रुपया खर्च न करता पाहता येणार आहे. (Latest sports updates)

तसेच तुम्हाला या सामन्याचे समालोचन ऐकायचे असेल, तर तुम्ही ऑल इंडिया रेडिओच्या प्रसारभारतीवर जाऊन ऐकू शकता. या सामन्याचे लाईव्ह अपडेट्स तुम्ही www.saamtv.com वर मिळवू शकता.

भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बलाढ्य संघ आहेत. आयसीसीच्या रँकिंगमध्ये भारताचा संघ अव्वल स्थानी आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ... स्थानी आहे. दरम्यान पहिलाच सामना असल्याने दोन्ही संघ जोरदार खेळ करून विजयी सलामी देण्याच्या प्रयत्नात असणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Ashadh Wari: जांभळावर साकारला विठ्ठल! चांदवडच्या शिक्षकाची भक्ती आणि पर्यावरणाचा संदेश देणारी आगळीवेगळी कलाकृती|VIDEO

SCROLL FOR NEXT