world cup 2023 saam tv news
Sports

World Cup 2023: सुपर ओव्हर की बाऊंड्री काऊंट? फायनल टाय झाल्यास कसा लागणार निकाल? वाचा सविस्तर

World Cup Final 2023: वाचा कसा लावला जाईल निकाल.

Ankush Dhavre

World Cup 2023 Final Rule:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील अंतिम सामना येत्या १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. २०१९ मध्ये झालेल्या वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.

हा सामना टाय झाला होता. त्यानंतर सुपर ओव्हरचा थरार रंगला. सुपर ओव्हर देखील टाय झाली. शेवटी बाऊंड्री काऊंटमुळे इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आलं होतं. यावेळी असं काही झाल्यास, कसा लावला जाईल निकाल? जाणून घ्या.

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत बाऊंड्री काऊंटचा नियम लागु केला जाणार नाही. अंतिम सामना टाय झाल्यास, सुपर ओव्हर खेळवली जाईल. मात्र सुपर ओव्हर टाय झाल्यास बाऊंड्री काऊंटचा नियम लागु केला जाणार नाही. अशी स्थिती उद्भवल्यास दुसरी सुपर ओव्हर खेळवली जाईल. जोपर्यंत सामन्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत सुपर ओव्हर खेळवली जाईल.

इंग्लंड-न्यूझीलंड सामन्यात काय घडलं?

वर्ल्डकप २०१९ च्या अंतिम सामन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ५० षटक अखेर ८ गडी बाद २४१ धावा केल्या.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडचा डाव देखील २४१ धावांवर संपुष्टात आला. हा सामना टाय झाला,त्यामुळे सुपर ओव्हर खेळवली गेली. (Latest sports updates)

सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी करताना इंग्लंडने १५ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडला देखील १५ धावा करता आल्या. सुपर ओव्हर टाय झाल्यानंतर बाऊंड्री काऊंटच्या बळावर इंग्लंडला वर्ल्ड चॅम्पियन घोषित करण्यात आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Maharashtra News Live Update: आंबेगावच्या पोषण आहारावर ग्रामस्थांचा आक्षेप; काळवाडीत धान्याचे सॅम्पल घेऊन तपासणी सुरू

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT