gautam gambhir  twitter
क्रीडा

Gautam Gambhir PC: 'पाँटींगला लुडबुड करायची काय गरज..?', विराट-रोहितबाबत केलेल्या त्या वक्तव्यावरुन गंभीर भडकला

Gautam Gambhir On Ricky Ponting : ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी गौतम गंभीरने रिकी पाँटींगबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

Ankush Dhavre

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये टी-२० मालिकेचा थरार सुरु आहे. ही मालिका झाल्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये बॉर्डर गावसकर मालिका सुरु होणार आहे.

या मालिकेपूर्वी भारताचा हेड कोच गौतम गंभीरने मुंबईत पत्रकार परिषदेत सहभाग घेतला होता. या पत्रकार परिषदेत बोलताना त्याने रिकी पाँटींगची बोलती करणारं वक्तव्य केलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू रिकी पाँटींगने आयसीसी रिव्ह्यूमध्ये बोलताना रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. रिकी पाँटींग म्हणाला होता की, 'मी काही दिवसांपूर्वी विराटची आकडेवारी पाहीली, त्यात असं लिहीलं होतं की, विराटने गेल्या ५ वर्षांत केवळ २ (तीन) शतकं झळकावली आहेत. हे पाहून मला मुळीच ठीक वाटलं नाही. म्हणजे, ही चिंतेची बाब आहे.

याबाबत बोलताना गंभीर म्हणाला की, 'पाँटींगला लुडबुड करायची काय गरज..? मला तरी हेच वाटतं की, त्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा विचार करावा. मला विराट आणि रोहितची चिंता नाही.' यासह गौतम गंभीर विराट कोहली आणि रोहित शर्माला समर्थन करताना दिसून आला आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफीला येत्या २२ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघातील खेळाडू लवकरच ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहेत.

या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उप-कर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत, सरफराज खान, ध्रुव जुरेल, आर अश्विन, रविंद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.

राखीव खेळाडू: मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Traffic: मतदानाच्या दिवशी मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या...

Bed Tea: सकाळी झोपेतून उठल्यावर बेड टी घेणे योग्य की अयोग्य?

Maharashtra Politics : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Success Story: सकाळी डॉक्टरचं कर्तव्य अन् रात्री UPSC चा अभ्यास; IPS डॉ. आदिती उपाध्याय यांचा प्रेरणादायी प्रवास

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT