WI vs IND 4th T20I
WI vs IND 4th T20I Saam tv
क्रीडा | IPL

WI vs IND 4th T20I: टीम इंडियासमोर विजयासाठी १७९ धावांचं आव्हान; करो या मरो सामन्यात भारताच्या खेळीकडे साऱ्यांचं लक्ष

Vishal Gangurde

IND vs WI 4th T20I : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांचा चौथा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना सुरू आहे. हा चौथा सामना अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील सेंट्रल ब्रोवर्ड स्टेडियमवर सुरू आहे . या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजने २० षटकात ८ गडी गमावून टीम इंडियासमोर १७९ धावांचं दिलं आहे. करो या मरो सामन्यात भारताच्या खेळीकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. (latest Marathi News)

वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजने पहिल्या पॉवर प्लेमध्ये जोरदार खेळी खेळली. मात्र, अर्शदीप सिंगने केयल मेयर्सला बाद करत वेस्ट इंडिजला मोठा धक्का दिला.

पहिल्या पॉवरप्लेमध्येच अर्शदीपने वेस्ट इंडिजला दोन धक्के दिले. पॉवर प्लेनंतर कुलदीप यादवच्या फिरकीची जादू जोरदार चालली. कुलदीपने निकोलस पूरनला आणि कर्णधार रोव्हमन पॉवेलला प्रत्येक एक धावावर बाद केले.

वेस्ट इंडिजचे चार गडी बाद झाल्यानंतर शाय होप आणि शिमरॉन हेटमायर मैदानावर होते. या दोघांनी संघाचा डाव सांभाळला. शाय होप आणि शिमरॉन हेटमायर यांनी पाचव्या विकेटसाठी ४९ धावांचा भागीदारी रचली. दोघेही संघासाठी योगदान देत असताना या दोघांची भागीदारी युझवेंद्र चहलने फोडली. (Latest Cricket News)

होप बाद झाल्यानंतर शिमरॉन हेटमायरने संघाची कमान सांभाळण्याचा प्रयत्न केला. हेटमायरने या सामन्यात अर्धशतकी खेळी खेळली. हेटमायरने ३५ चेंडूत अर्धशतक ठोकलं. वेस्ट इंडिजने २० षटकात ८ गडी गमावून १७८ धावा ठोकल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Curd Benefits: वजन कमी करण्यासाठी खा दही, होतील अनेक फायदे

Pune Crime: पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी खुनाचा थरार! डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या; कोंढव्यातील घटना

Today's Marathi News Live: भिंडेच्या कंपनीचे दादरमध्ये ८ अनधिकृत होर्डिंग

Uddhav Thackeray: आमचं सरकार सत्तेत आल्यावर 'त्या' पोलिसांवर कारवाई करणार; उद्धव ठाकरेंचा थेट इशारा

Mumbai Goa Highway Traffic Jam: जाणवली ग्रामस्थांनी मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुक राेखली, वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT