Rohit Sharma After Loss saam tv
Sports

Rohit Sharma: आम्ही अपेक्षा केली नव्हती की...; लाजीरवाण्या पराभवानंतर काय म्हणाला रोहित शर्मा?

Rohit Sharma After Loss: न्यूझीलंडने भारताचा ८ विकेट्सने पराभव केला. या सामन्यानंतर टीमचा कर्णधार रोहित शर्मा काय म्हणालाय ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये पहिला टेस्ट सामना खेळवण्यात आला. या सामन्यामध्ये टीम इंडियाला पराभवाची चव चाखावी लागली. न्यूझीलंडने भारताचा ८ विकेट्सने पराभव केला. या सामन्यामध्ये सर्वात लाजीरवाणी गोष्ट म्हणजे, टीम इंडिया पहिल्या डावात ४६ रन्सवर ऑलआऊट झाली. ज्याची खूप मोठी किंमत टीम इंडियाला मिळाली.

न्यूझीलंडच्या या विजयामुळे किवींनी ३ सामन्यांच्या टेस्ट सिरीजमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे. याशिवाय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्येही किवींना मोठा फायदा झाला आहे. या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा काय म्हणाला ते पाहूयात.

पराभवानंतर काय म्हणाला रोहित शर्मा?

पराभवानंतर रोहित शर्मा म्हणाला, “आम्ही दुसऱ्या डावात चांगली कामगिरी केली. पण आम्ही पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली नाही. यामुळे पुढे काय होणार आहे याची आम्हाला आधीच कल्पना होती. या सामन्यात काही खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. जेव्हा तुम्ही 350 रन्सने मागे असता तेव्हा तुम्ही त्याबद्दल जास्त विचार करू शकत नाही. मात्र आम्ही चांगला प्रयत्न केला.”

रोहित पुढे म्हणाला, “ऋषभ पंत आणि सरफराज खान यांनी दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी केली. मी माझ्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की, आम्हाला माहितीये की सुरुवातीला हे कठीण होईल. परंतु आम्ही 46 रन्सवर बाद होण्याची अपेक्षा केली नव्हती. न्यूझीलंडने चांगली गोलंदाजी केली आणि आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ शकलो नाही. असे खेळ होत राहतात.”

२४ ऑक्टोबरला खेळवली जाणार दुसरी टेस्ट

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 24 ऑक्टोबरला दुसरा टेस्ट सामना रंगणार आहे. हा सामना पुण्यात होणार रंगणार असून या सामन्यात भारताला विजय मिळवावा लागेल. जर हा सामना हरला तर टीम इंडियाला सिरीज देखील गमवावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इराणमध्ये अमिरेकन लढाऊ विमान कोसळलं, पायलटला पकडण्यासाठी बक्षीस केलं जाहीर, VIDEO

Fact Check: केंद्र सरकारची वर्क फ्रॉम होम योजना? महिलांना 25 हजार मानधन मिळणार?

Ashok Kharat: मुलानेच उघड केलं खरातचं हवाला कांड? चौकशीदरम्यान SIT ला सांगितली धक्कादायक माहिती

अवकाळी पावसाने वाजवले स्मार्ट सिटीचे तीनतेरा; स्मार्ट सिटी की 'नरक' सिटी, पुणेकरांचा संताप

Earthquake: दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्याने हादरला, नागरिक घाबरून घराबाहेर पळाले; VIDEO समोर

SCROLL FOR NEXT