Gautam Gambhir Reaction
Gautam Gambhir Reaction Twitter
क्रीडा | IPL

Gautam Gambhir Reaction : LSG ने सामना जिंकताच दिसला गौतमचा 'गंभीर' अवतार! विराटच्या फॅन्सला केला गप्प राहण्याचा इशारा - VIDEO

Ankush Dhavre

Gautam Gambhir Reaction RCB VS LSG Match: आयपीएल २०२३ स्पर्धेत सोमवारी एक रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला १ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे.

प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २१२ धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा यशस्वीरित्या पाठलाग करत लखनऊ सुपर जायंट्स संघाने जोरदार विजय मिळवला. दरम्यान या विजयानंतर गौतम गंभीरने दिलेली रिअॅक्शन सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

या सामन्यानंतर गौतम गंभीरचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. लखनऊ सुपर जायंट्स संघाचा मेंटॉर गौतम गंभीर ४० षटके एकाच ठिकाणी बसून होता. मात्र लखनऊचा विजय होताच गौतम गंभीरचे रौद्ररूप पाहायला मिळाले आहे. गौतम गंभीर विजयाचा जल्लोष साजरा करताना दिसून आला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गौतम गंभीर खुर्चीवरून उठून जल्लोष साजरा करताना दिसून येत आहे. यापूर्वी गौतम गंभीर इतका आक्रमक कधीच दिसून आला नव्हता. यासह तो तोंडावर बोट ठेऊन एम चिन्नस्वामीच्या मैदानावर सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना तोंडावर बोट ठेऊन शांत राहायला सांगताना देखील दिसून येत आहे. (Latest sports updates)

आयपीएल स्पर्धेत आपण अनेकदा असं पाहिलं आहे की, गौतम गंभीर डगआउटमध्ये असताना शांत दिसून आला आहे. मात्र यावेळी गौतम गंभीरचा रुद्रावतार पाहायला मिळाला.

गौतम गंभीरचा हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी त्याला ट्रोल केले आहे. तर काही चाहत्यांना त्याचा हा अंदाज आवडला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: उद्धव ठाकरे सहकुटुंब मुंबदेवीच्या दर्शनाला

Paru And Aditya Wedding : 'पारू'च्या नव्या प्रोमोने वेधलं लक्ष, पारू आणि आदित्यचं लग्न होणार पण...

Home Tips: पावसाळा येतोय! तर घरातील लाकडी फर्निचरची घ्या अशी काळजी

Lok Sabha Election: डॉ.मनमोहन सिंह आणि हमीद अन्सारी यांनी घरून केलं मतदान, वयोवृद्ध मतदारांसाठी आयोगाने केली विशेष व्यवस्था

Priyanka Gandhi : माझ्या शहीद आजी आणि शहीद वडिलांना देशद्रोही बोलल्यावर गप्प का बसू? प्रियांका गांधी कडाडल्या

SCROLL FOR NEXT