Washington Sundar Dismissal saam tv
Sports

IPL 2025: वॉशिंग्टन सुंदरच्या विकेटने मैदानात राडा; शुभमन गिलही अंपायरवर संतापला, SRH ने खरंच केली चिटींग?

IPL 2025, SRH vs GT: गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात थर्ड अंपायरच्या निर्णयावर मोठा गोंधळ उडाला. वॉशिंग्टन सुंदरची विकेट ही वादग्रस्त ठरली आणि त्यामुळे मैदानावरच नाही तर सोशल मीडियावरही चर्चेला उधाण आलं.

Surabhi Jayashree Jagdish

रविवारी आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात गुजरातने हैदराबादचा दारूण पराभव केला. दरम्यान या सामन्यात एक वेळ अशी आली की, थर्ड अंपायरच्या निर्णयावर मोठा वाद निर्माण झाला. गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान, वॉशिंग्टन सुंदरच्या विकेटने मोठा गदारोळ माजला. सुंदरने २९ चेंडूत ४९ रन्स केले.

खरंच आऊट होता का वॉशिंग्टन सुंदर?

गुजरात टायटन्सच्या (जीटी) डावाच्या १४ व्या ओव्हरमध्ये वॉशिंग्टन सुंदरने मोहम्मद शमीचा शॉर्ट लेंथ बॉल स्वीपर कव्हरकडे मारला आणि यावेळी अनिकेत वर्माने तो कॅच घेतला. दरम्यान अनिकेत वर्माने क्लीन कॅच घेतला की नाही याची खात्री मैदानावरील अंपयारना नव्हती. त्यावेळी मैदानावरील अंपायरने हा निर्णय घेण्याची थर्ड अंपायरकडे सोपवला. रिप्लेमध्ये बॉल जमिनीला स्पर्श करत असावा असं दिसून आलं. मात्र तरीही त्यांनी सुंदरला बाद केलं.

थर्ड अंपायरच्या निर्णयाने खळबळ

निर्णय दिल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर बाहेर पडत असताना या घटनेची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. यावेळी चाहत्यांनी थर्ड अंपायरवर टीकाही केली. यावेळी गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने अंपायरशी चर्चा देखील केली. मात्र वॉशिंग्टन सुंदरच्या विकेटने गुजरात टायटन्सवर फारसा फरक पडला नाही. मोहम्मद सिराजच्या आक्रमक गोलंदाजी आणि कर्णधार शुभमन गिलच्या शानदार नाबाद अर्धशतकाच्या जोरावर गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादचा ७ विकेट्सने पराभव केला.

हैदराबादचा पुन्हा पराभव

वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याची उत्कृष्ट गोलंदाजी आणि त्यानंतर कर्णधार शुभमन गिल यांचं अर्धशतक यांच्या जोरावर गुजरातने हैदराबादचा पराभव केला. मोहम्मद सिराजसह वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा आणि डावखुरा फिरकी गोलंदाज साई किशोर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतले. सनरायझर्स हैदराबादला २० ओव्हरमध्ये आठ विकेट गमावत १५२ रन्स करता आले.

गिल आणि शेरफेन रदरफोर्ड यांच्यातील चौथ्या विकेटसाठी २१ चेंडूत ४७ रन्सच्या भागीदारीच्या मदतीने गुजरात टायटन्सने १६.४ षटकांत तीन गडी बाद १५३ धावा करून विजय मिळवला. अशा पद्धतीने सनरायझर्स हैदराबादला सलग चौथ्या पराभवाला सामोरं जावं लागलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT