Viswanathan Anand Birthday  Saam Tv
क्रीडा

Viswanathan Anand Birthday : बुद्धिबळाचा सम्राट विश्वनाथन आनंद, ग्रँडमास्टरने पटकावलेत 'हे' प्रतिष्ठित किताब

आज (११,डिसेंबर) विश्वनाथन आनंद यांचा वाढदिवस. जाणून घेवूया त्यांच्या यशस्वी प्रवासाबद्दल.

साम टिव्ही ब्युरो

Viswanathan Anand News : बुद्धिबळातील राजा म्हणून विश्वनाथन आनंदचे नाव घेतले जाते. बुद्धिबळातील त्याच्या कुशल खेळीने त्याचे नाव यशस्वी बुद्धिबळपटूंच्या यादीत सामिल आहे. बुद्धिबळाच्या खेळात आनंदने आपल्या शानदार कामगिरीने सर्वांची मने जिंकली आहेत. त्याने एकूण 5 वेळा विश्वविजेतेपद पटकावले आहे. तो 2000, 2007, 2008, 2010 आणि 2012 मध्ये वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे. आज (११,डिसेंबर) विश्वनाथन आनंद यांचा वाढदिवस. जाणून घेवूया त्यांच्या यशस्वी प्रवासाबद्दल. (Latest Marathi News)

विश्वनाथन आनंदचा जन्म ११ डिसेंबर १९६९ रोजी मद्रास येथे झाला. विश्वनाथन आनंदच्या नेत्रदिपक कामगिरीची दखल घेत त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. इतकेच नव्हेतर विश्वनाथन आनंद हा खेलरत्न पुरस्काराने सन्मानित होणारा पहिला खेळाडू होता. आता या पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार करण्यात आले आहे.

यासोबतच पद्मश्रीने सन्मानित होणारे तो पहिला खेळाडू होता. त्यांना राजीव गांधी (Rajiv Gandhi) खेलरत्न पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार, पद्मविभूषण पुरस्कार, सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कार आणि राष्ट्रीय नागरिक पुरस्कार, बुक ऑफ द इयर पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, पद्मश्री यांसारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

या पुरस्कारासोबतच विश्वनाथ आनंद यांच्याशी संबंधित अशा अनेक कथा आहेत ज्या त्यांना अद्वितीय बनवतात. 2010 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांना त्यांच्यासोबत जेवणाचे निमंत्रण दिले होते.

दरम्यान, विश्वनाथन आनंद यांच्या यशात त्यांच्या आईचा सर्वात मोठा वाटा असल्याचे ते सांगतात. विश्वनाथन आनंदने वयाच्या ६ व्या वर्षापासून बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. 1991 मध्ये गॅरी कोसप्रोव्हचा पराभव केल्यावर त्याला प्रसिद्धी मिळाली. या विजयानंतर तो देशात खूप लोकप्रिय झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT