Viender Sehwag Saam Tv
Sports

Virender Sehwag: सेहवागने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येतंय का? त्या स्कोअरकार्डमध्ये काय दडलंय?

सेहवागने ही पोस्ट शेअर करताच कमेंट्सची रांगच लागली आहे.

प्रविण वाकचौरे

Virender Sehwah News: भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतो. सेहवाह विविध पद्धतीने त्याच्या फॅन्ससोबत संवाद साधत असतो. महत्त्वाच्या विषयांवरही तो भाष्य करत असतो. आता सेहवागने पाकिस्तानविरुद्धच्या एका जुन्या सामन्याचं स्कोअरकार्ड सोशल मीडियावर शेअर केलं आहे आणि यूजर्सना एक प्रश्न विचारला आहे.

सेहवागने 2004 मध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्याचं स्कोअरकार्ड शेअर केलं आहे. .या सामन्यात टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने 128 तर वीरेंद्र सेहगावने 248 धावा कुटल्या होत्या. सेहवागने हा फोटो शेअर करत लिहिले की, 'स्कोअर कार्ड विसरा. भारताच्या या प्लेइंग 11 बद्दल एक अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट सांगू शकाल का?  (Latest Marathi News)

सेहवागने ही पोस्ट शेअर करताच कमेंट्सची रांगच लागली आहे. पृथ्वी नावाच्या युजरने लिहिले की, 'भारत फक्त एक फिरकी गोलंदाज घेऊन उतरला आहे.' यावर सेहवागने स्माईल इमोजी शेअर करत म्हटलं, 'अरे नाही यार, अनिल भाई रागावतील. भारताच्या कसोटी क्रिकेटमधील महान मॅच विनर.

फरीद नावाच्या युजरने लिहिले, 'सर्व 11 खेळाडूंचे कसोटी शतक आहे.' एकाने लिहिले की, 'प्रत्येक खेळाडूने किमान एक कसोटी शतक झळकावले आहे आणि सर्वांकडे प्रत्येकी एक कसोटी विकेट आहे.'

पाकिस्तानच्या रावळपिंडीत इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या मॅचनंतर हे स्कोर कार्ड सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या सामन्यात इंग्लंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला आणि अवघ्या 91 षटकांत 7 गडी गमावून 608 धावा केल्या. ज्या प्रकारे पाकिस्तानी गोलंदाजांची दाणादाण उडाली, याने 2000 च्या सुरुवातीच्या भारतीय संघाची आठवण झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT