Virat Kohli
Virat Kohli Saam Tv
क्रीडा | IPL

Virat Kohli Wicket: विराटच्या विकेटमुळे पेटला नवा वाद! संतप्त चाहत्यांनी अंपायरवर केला 'चीटिंग'चा आरोप

Saam TV News

Virat Kohli Wicket: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरु आहे.या सामान्यतील दुसऱ्या दिवशी एक मोठा वाद पेटल्याचे पाहायला मिळाले आहे. विराट कोहलीला बाद घोषित करताच नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पहिल्या डावात फलंदाजी करत असताना विराट कोहली फॉर्ममध्ये असल्याचे दिसून येत होते. तो ४४ धावांवर फलंदाजी करत असताना अंपायरने केलेल्या चुकीमुळे त्याला माघारी परतावं लागलं आहे. (Latest Sports Updates)

तर झाले असे की, भारतीय संघाची पहिल्या डावात फलंदाजी करत असताना मॅथ्यु कुन्हेमन गोलंदाजी करण्यासाठी आला होता. मॅथ्यु कुन्हेमनने टाकलेला चेंडू विराटच्या पॅडला जाऊन लागला.

गोलंदाजाने अपील करताच अंपायरने त्याला बाद घोषित केले. त्यानांतर विराटने डीआरएसची मागणी केली. डीआरएसमध्ये देखील स्पष्टपणे दिसून येत नव्हते. मात्र अंपायरने बाद घोषित केल्यामुळे विराटला माघारी परतावं लागलं.

ज्यावेळी तिसऱ्या अंपायरने विराटला बाद घोषित केले त्यावेळी विराट कोहली संतापल्याचे पाहायला मिळाले. केवळ विराट कोहलीचा नव्हे तर संघ व्यवस्थापक आणि राहुल द्रविड यांनी देखील संतप्त प्रतिक्रीया दिल्या.

ट्विटरवर चाहत्यांनी व्यक्त केला संताप..

कसा बाद झाला विराट.?

मॅथ्यु कुन्हेमनने टाकलेल्या चेंडूवर विराट कोहलीने समोरच्या दिशेने डिफेंस करण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू सरळ राहिला. त्यामुळे चेंडू विराटच्या बॅट आणि पॅडला जाऊन लागला. अंपायरने त्याला बादघोषित केले.

मात्र तुम्ही जर पाहिलं तर चेंडू पॅडला लागण्यापूर्वी बॅटला लागून गेला आहे. विराटने डीआरएस देखील घेतला मात्र डीआरएस पाहिल्यानंतर अंपायरने त्याला बाद घोषित केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Loksabha Voting: ओशिवरामध्ये भाजप-ठाकरे गट आमनेसामने, मतदारांना प्रलोभन दाखवत असल्याचा आरोप

लक्झरीयस कार आणि अलिशान घर; इतक्या कोटींचा मालक आहे Jr NTR

MS Dhoni Retirement: धोनी निवृत्ती केव्हा घेणार? CSK च्या अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Aadhar Card: मृत्यूनंतर तुमच्या आधारकार्डचं काय होणार? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Lok Sabha Voting Live: मुंबईतील पवई मतदान केंद्रावर नागरिकांचा गोंधळ

SCROLL FOR NEXT