Virat Kohli saam TV
Sports

Virat Kohli : दोन वर्षानंतर कोहलीचं धडाकेबाज शतक! अफगाणिस्तान विरुद्ध भारताचा 'विराट' विजय

विराट कोहलीने शतक ठोकून अफगाणिस्तान विरुद्ध

नरेश शेंडे

दुबई : आशिया करंडक स्पर्धा २०२२ मधून (Asia Cup 2022) भारतीय क्रिकेट संघाचं आव्हान संपुष्टात आलं असतानाच आज अफगाणिस्तान आणि भारत यांच्यात सामना रंगला. भारताने अफगाणिस्तानला २१३ धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र, अफगाणिस्तानने २० षटकांत आठ विकेट्स गमावत ११८ धावा केल्या. त्यामुळे भारताचा १०१ धावांनी दणदणीत विजय झाला आहे. विशेष म्हणजे भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीने अफगाणिस्तान विरुद्ध धडाकेबाज शतक ठोकून टीम इंडियाला (Indian Cricket Team) नवसंजीवनी दिली आहे. तब्बल ८३ इनिंग्स खेळल्यानंतर कोहलीने शतकी खेळी केली आहे. कोहली अफगाणिस्थान विरोधात शतक ठोकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. (Virat kohli latest news update)

विराट कोहली गेल्या दोन-तीन वर्षांपासून मोठी खेळी करण्यासाठी संघर्ष करत होता. परंतु, यंदाच्या आशिया कपमध्ये विराटच्या बॅटमधून जोरदार फटकेबाजी झाल्याने दोन अर्धशतक आणि एक शतकी खेळी झाली आहे. यापूर्वी विराटने २३ नोव्हेंबर २०१९ ला बांग्लादेश विरुद्ध शेवटचं शतक ठोकलं होतं. कोहलीने ६१ चेंडूत नाबाद १२२ धावा कुटल्या. यामध्ये १२ चौकार आणि सहा षटकारांचा समावेश आहे. तसंच भारताचा सलामीवीर फलंदाज के एल राहुलनेही ६२ धावा करून चमकदार कामगिरी केली.

कोहलीने जवळपास दोन वर्षानंतर शतक ठोकलं आहे. यापूर्वी कोहलीने शेवटचं शतक नोव्हेंबर २०१९ मध्ये बांग्लादेश विरुद्ध केलं होतं. कोलकतामध्ये विराटने शतकी खेळी केली होती. विराट कोहलीने आज शतक करून रिकी पॉन्टिंगची बरोबरी केली आहे. तसंच कोहली अफगाणिस्थान विरोधात शतक ठोकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. याआधी ल्यूक राईटने या संघाविरोधात ९९ धावांची खेळी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

SCROLL FOR NEXT