ठाणे : येथील ग्रामीण परिसरात राहणाऱ्या चार जणांची एका हत्या प्रकरणात निर्दोष मुक्तता झाली आहे. ठाणे न्यायालयाने (Thane court) हा निकाल दिला असून या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश शौकर गोरवाडे यांच्या पीठापुढे करण्यात आली. पुराव्याअभावी फिर्यादीला हत्येचा गुन्हा सिद्ध करता आला नाही, असं न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे हत्येचा आरोप असलेल्या शंकर मंग्या पिंगला, यशवंत कॅली भगत, काशीनाथ भाऊ गावंडा आणि आंत्या सोमा पारधी यांची हत्येच्या खटल्यातून निर्दोश मुक्तता करण्यात आली आहे. (Thane court latest News update)
मिळालेल्या माहितीनुसार, २१ सप्टेंबर २०१० ला खर्डी आणि उंबरमाली या भागात असलेल्या रेल्वे रुळाजवळ संजय बांगरे (२३) या इसमाचा मृतदेह सापडला होता. प्राथमिक चौकशीनंतर चार जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. ताब्यात घेतलेले आरोपी मृत पावलेल्या इसमाच्या पत्नीचे नातेवाईक आहेत. बांगरे आणि त्याच्या पत्नीत नेहमी वादविवाद होत असत. महिलेसोबत होणारे वाद थांबवण्यासाठी सासरच्या नातेवाईकांनी अनेकदा बांगरला समजावून सांगितलं होतं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.