विराट कोहलीने दिले कसोटी संघ बदलाचे संकेत  Twitter/ @ICC
Sports

विराट कोहलीने दिले कसोटी संघ बदलाचे संकेत

न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर कसोटी संघात बदलावाचे संकेत दिले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC Finals) अंतिम सामन्यातील पराभवानंतर कसोटी संघात बदलावाचे संकेत दिले आहेत. कोहली म्हणाला जे खेळाडू चांगले प्रदर्शन करतील त्यांनाच संघात स्थान दिले जाईल. कोहलीने (Virat Kohli) कोणाच्याही नावाचा उल्लेख केलेला नाही. परंतु, म्हणाला की संघातील काही खेळाडूंमध्ये धावा करण्याची क्षमता नाही. कोहलीचा इशारा कदाचित पुजाऱ्यावर असावा. कारण पुजाराने अंतिम सामन्यात पहिल्या डावात ५४ चेंडूंमध्ये ८ धावा बनवल्या तर दुसऱ्या डावात ८० चेंडूत १५ धावा केल्या.

कोहली म्हणाला की ''आम्ही आत्मपरीक्षण करत राहू आणि संघ मजबूत करण्यासाठी काय केले पाहिजे यावर विचार करू. याच मार्गाने आम्ही पुढे जाणार नाही. जर तुम्ही आमच्या मर्यादित षटकांच्या संघाकडे लक्ष दिले तर आमच्याकडे खोली आहे आणि खेळाडूंचा आत्मविश्वास भरपूर आहे. कसोटी क्रिकेटमध्येही याची गरज आहे. आम्हाला नव्याने नियोजन करावे लागणार आहे. निर्भयपणे कसे खेळता येईल हे समजून घ्यावे लागेल. संघात योग्य लोकांना स्थान द्यावे लागेल''.

दुसरीकडे, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने आपल्या संघाला विजय समर्पित केला आहे. विल्यमसन म्हणाला '' मी खूप कमी वेळ न्यूझीलंड संघाचा भाग आहे. मला खूशी आहे आम्ही पहिल्यांदाच विश्व किताब जिंकला आहे. मागच्या दोन वर्षात आमचे २२ खेळाडू, संघ व्यवस्थापक, आणि या संघात खेळणारे खेळाडू यांनी महत्वाची भूमिका निभावली आहे''.

विलियम्सन पुढे म्हणाला '' आमच्या संघात स्टार खेळाडूंचा भरणा नसतो. परंतु, आम्ही याच खेळाडुंना सोबत घेऊन चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. भारतासारखी भलाढ्य टीम समोर असताना आमच्या खेळाडूंनी चांगला खेळ केला. हा अंतिम सामना होता मोठा सामना होता तो जिंकलो त्याचा आनंद आहे. हा आमच्यासाठी ऐतिहासिक विजय होता''.

Edited By : Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT