virat kohli twitter
Sports

Virat Kohli On WTC Final: WTC कशी जिंकणार? विराटने सांगितला टीम इंडियाचा प्लान

Virat Kohli: या सामन्यापूर्वी माजी भारतीय कर्णधार विराट कोहलीने मोठं वक्तव्य केलं आहे.

Ankush Dhavre

IND VS AUS WTC Final 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना येत्या ७ ते ११ जून दरम्यान पार पडणार आहे. या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. या सामन्यासाठी दोन्ही संघातील खेळाडू कसून सराव करत आहेत.

भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

त्यामुळे यावेळी भारतीय संघातील खेळाडू आणखी जास्त जोर लावताना दिसून येणार आहेत. या सामन्यापूर्वी माजी भारतीय कर्णधार विराट कोहलीने मोठं वक्तव्य केलं आहे.

विराट कोहलीने स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हटले की, 'ओव्हल मैदानावरील परिस्थिती नक्कीच आव्हानात्मक असणार आहे. आम्हला फ्लॅट विकेट मिळणार नाही.त्यामुळे आम्हाला सावध राहावं लागणार आहे. आम्हाला अधिक लक्ष केंद्रित करण्याची आणि परिस्थिती समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे अनुशासन राखून ठेवणं गरजेचं आहे.'

तसेच सामना कसा जिंकायचा याबाबत बोलताना विराट कोहली म्हणाला की ,' वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात केवळ १ सामना असणार आहे. जो संघ परिस्थिती समजून घेईल किंवा ज्या संघाला खेळपट्टीचा अंदाज येईल तोच संघ हा सामना जिंकेल. हेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचं वैशिष्ठ्य आहे.' वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विराट कोहलीवर मोठी जबाबदारी असणार आहे. कारण जर भारतीय संघाला हा सामना जिंकायचा असेल तर विराट कोहलीने धावा करणं गरजेचं आहे. (Latest sports updates)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ :

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू: यशस्वी जयस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT