rohit sharma virat kohli dance twitter
क्रीडा

Rohit- Virat Dance: वानखेडेवर विराट- रोहितची हवा! ढोल-ताशांच्या तालावर मनसोक्त नाचले,पाहा VIDEO

Ankush Dhavre

मुंबईत ४ जूलैला भारतीय संघाच्या विजयाचा गुलाल उधळला. भारतीय संघाने २९ जूनला बारबाडोसच्या मैदानावर भारतीय संघाला पराभूत केलं आणि दुसऱ्यांदा जेतेपदाला गवसणी घातली. दुसऱ्यांदा वर्ल्डकपची ट्रफी उंचावल्यानंतर भारतीय संघ ४ जुलैला भारतात दाखल झाला. मायदेशी परतल्यानंतर विजयाच्या सेलिब्रेशनची पहिली झलक दिल्लीत पाहायला मिळाली.

त्यानंतर मुंबईत भारतीय संघाचं जोरदार स्वागत झालं. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर भारतीय संघाने प्रेक्षकांचे आभारही मानले. दरम्यान रोहित शर्मा आणि विराट कोहलीने एकत्र डान्स केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

भारतीय संघाचं गुरुवारी सकाळी ६ वाजता दिल्लीतील विमानतळावर स्वागत झालं. भारतीय खेळाडूंना पाहण्यासाठी दिल्लीकर मध्यरात्रीपासूनच विमानतळाबाहेर वाट पाहत उभे होते. त्यावेळी खेळाडूंनी विमानतळाबाहेर डान्स केला. त्यानंतर खेळाडूंनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी नरेंद्र मोदींनी खेळाडूंचं कौतुक केलं आणि त्यांच्यासोबत फोटशूटही केलं. दरम्यान बीसीसीआयने नरेंद्र मोदींना भारतीय संघाची जर्सी गिफ्ट केली. ज्यावर नमो १ असं लिहिलेलं होतं.

रोहित- विराटचा डान्स

दिल्लीतून मुंबईत आल्यानंतर नरीमन पॉईंटपासून ते मरीन ड्राईव्हपर्यंत भारतीय संघाची जंगी मिरवणूक काढण्यात आली. हजारो फॅन्स वानखेडे स्टेडियमच्या आत आणि त्याहून कितीतरी पटीने अधिक फॅन्स हे मैदानाबाहेर भारतीय संघाची वाट पाहत होते. दरम्यान मैदानात आल्यानंतर ढोल-ताशांचा गजर झाला. हे पाहून विराटला मोह आवरला नाही. त्याने ढोल-ताशांचा तालावर डान्स करायला सुरुवात केली. त्यानंतर रोहितनेही ताल धरला. दोघांच्या या भन्नाट डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघातील स्टार खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोघेही यापुढे भारतीय संघासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसून येणार नाहीत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi Grand Finale: ग्रँड फिनालेच्या मंचावर इरिना-वैभवच्या धमाकेदार डान्सचा जलवा

Sabudana Role Recipe: उपवासाठी तयार करा झटपट साबूदाणा रोल्स, वाचा परफेक्ट रेसिपी

Marathi News Live Updates : उड्डाण पुलाच्या कामाच्या श्रेयवादाची लढाई; भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने

Nandurbar News : भरधाव ट्रकने मेंढ्यांना चिरडले; शंभरहून अधिक मेंढ्या ठार

Sanjay Raut: 'कितीही फिरले, थापा मारल्या तरी आमचेच सरकार येणार..', संजय राऊतांचा PM मोदींवर निशाणा

SCROLL FOR NEXT