Virat Kohli Mohammed Siraj Video  x
Sports

Virat Siraj Video : सात वर्ष ज्याच्यासोबत खेळला, त्यालाच ठसन देणार, सामन्याआधी सिराज विराटच्या समोर गेला अन्...

Virat Kohli Mohammed Siraj Video : उद्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना रंगणार आहे. उद्या पहिल्यांदा मोहम्मद सिराज आरसीबीच्या विरुद्ध खेळताना दिसणार आहे. या सामन्याआधी विराट आणि सिराजचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Yash Shirke

आयपीएल २०२५ ची धूमधाम सुरु आहे. उद्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स हा सामना खेळला जाणार आहे. घरच्या स्टेडियममध्ये खेळत असल्याने हा सामना आरसीबी फॅन्ससाठी खास असणार आहे. पण त्याहीपेक्षा पहिल्यांदा मोहम्मद सिराज आरसीबीच्या विरोधात खेळत असल्याने या सामन्याची चर्चा आहे.

२०१७ मध्ये सनरायजर्स हैदराबादच्या माध्यमातून मोहम्मद सिराजने आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. २०१८ मध्ये मोहम्मद सिराज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये सहभागी झाला होता. २०१८ ते २०२४ या कालावधीत त्याने गोलंदाजीच्या माध्यमातून योगदान दिले होते. खासकरुन विराट कोहलीसोबत त्याचे खास नाते तयार झाले होते. मागच्या वर्षी आरसीबीने सिराजला रिलीज केले होते. आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये गुजरातने सर्वाधिक बोली लावून सिराजला संघात सामील केले होते.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना उद्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. २०१८ नंतर पहिल्यांदाच सिराज बंगळुरूच्या विरोधात खेळणार आहे. यामुळे उद्याच्या सामन्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. अशातच विराट कोहली आणि मोहम्मद सिराजचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विराट आणि सिराज एकमेकांना मिठी मारत असल्याचे दिसते. त्यांच्यातील बॉडिंग व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

आरसीबीने आयपीएल २०२५ मधील दोन्ही सामने जिंकले आहेत. पहिल्या सामन्यात गतविजेते केकेआर आणि दुसऱ्या सामन्यात सीएसकेचा आरसीबीने पराभव केला आहे. तर दुसऱ्या बाजूला गुजरातने पंजाबविरुद्धचा गमावला, त्यानंतर मुंबईच्या सामन्यामध्ये गुजरात टायटन्सने कमबॅक केले. उद्याचा सामना कोणता संघ जिंकेल याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, खात्यात खटाखट जमा होणार ₹3000; तारीख आली समोर

Maharashtra Live News Update : अंबरनाथमध्ये २०८ संशयित बोगस मतदार ताब्यात; पोलीस चौकशी सुरू

Winter Skin Health : हिवाळ्यात त्वचा काचेसारखी चमकेल, दररोज 'या' 5 पैकी कोणताही एक पदार्थ खा

Kidney Racket : ५० हजार घेतले, ७४ लाख झाले; कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांनी विकल्या किडन्या, विदर्भातील प्रकरणाने राज्यात खळबळ

Saturday Remedies: शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी शनिवारी करा 'हे' ३ सोपे उपाय; घरातील कटकटी होतील कायमच्या दूर!

SCROLL FOR NEXT