virat kohli hugged rohit sharma twitter
Sports

IND vs SL: श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात विराट- रोहितचा ब्रोमान्स! भन्नाट झेल घेताच दिली प्यारवाली झप्पी; पाहा VIDEO

Virat Kohli Hugged Rohit Sharma: या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांमध्ये ब्रोमान्स पाहायला मिळाला आहे.

Ankush Dhavre

Virat Kohli Hugged Rohit Sharma:

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये सुपर ४ फेरीतील सामना पार पडला. या रोमांचक सामन्यात भारतीय संघाने दमदार खेळ करत ४१ धावांनी विजय मिळवला आहे. यासह भारतीय संघाने आशिया चषकाच्या अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं आहे.

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने फलंदाजी करताना ५३ धावांची खेळी केली. तर धावांचा बचाव करताना त्याने जीव ओतून क्षेत्ररक्षण केलं. यादरम्यान त्याने स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करताना भन्नाट झेल टिपला आहे.

हा झेल टिपल्यानंतर विराट कोहलीने विराट कोहलीला मिठी मारली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

तर झाले असे की, श्रीलंकेची फलंदाजी सुरू असताना २६ वे षटक टाकण्यासाठी रविंद्र जडेजा गोलंदाजीला आला होता. त्यावेळी दासून शनाका स्ट्राईकवर होता. या षटकातील पहिलाच चेंडू शनाकाच्या बॅटचा कडा घेत वेगाने स्लिपमध्ये असलेल्या रोहित शर्माच्या हातात गेला.

हा झेल टिपताच विराट धावत आला आणि त्याने रोहितला मिठी मारली. विराट आणि रोहितच्या ब्रोमान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

विराट कोहलीने रोहितला मिठी मारल्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांच लक्ष वेधून घेत आहे. विराट आणि रोहितच्या जोडीने क्रिकेट चाहत्यांना सुरेश रैना आणि युवराज सिंगची आठवण करून दिली आहे.

जेव्हा युवराज सिंग झेल टिपायचा त्यावेळी सुरेश रैना जिथे कुठे असायचा तरीदेखील धावत यायचा आणि युवराज सिंगला मिठी मारायचा. (Latest sports updates)

भारताचा जोरदार विजय..

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर भारतीय कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाकडून डावाची सुरूवात करताना कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ५३ धावांची खेळी केली.

तर केएल राहुलने ३९ आणि ईशान किशनने ३३ धावांचे योगदान दिले. भारतीय संघाने या डावात २१३ धावा केल्या.

तर या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेकडून धनंजय डी सिल्वाने ४१ आणि वेलालागेने नाबाद ४२ धावांची खेळी केली. मात्र या दोघांची खेळी व्यर्थ गेली, कारण श्रीलंकेचा संघ विजयापासून ४१ धावा दूर राहिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

AI Video Creation: व्हिडिओ मेकिंग सोपं झालं! स्क्रिप्ट अपलोड करा आणि बघा कमाल, कोणतं आहे नवीन फिचर? वाचा सविस्तर

Mithila Palkar: साउथ इंडियन लूकमध्ये मिथिलाचं सौंदर्य खुललं| PHOTO

Black Box For Tractors: शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरवर जीपीएस आणि ब्लॅक बॉक्सची सक्ती; नव्या नियमांवर संतापाची लाट

Jalgaon Crime : घरात सुरू होता देहविक्रीचा व्यवसाय; डमी ग्राहक पाठवत पोलिसांची छापेमारी, दांपत्याला अटक

Pune Accident: श्रावण सोमवारी भाविकांवर काळाचा घाला, ३५ जणांना घेऊन जाणारा टेम्पो दरीत कोसळला; चौघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT