Virat kohli gets angry after his wicket smashes dustbin watch video amd2000 twitter
Sports

Virat Kohli Wicket: आधी अंपायरसोबत वाद, मग रागात डस्टबिन उडवलं; बाद घोषित केल्यानंतर विराट भडकला - Video

Virat Kohli Wicket Controversy, KKR vs RCB IPL 2024: विराट बाद होऊन मैदानाबाहेर जात असताना संताप व्यक्त करताना दिसून आला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील ३६ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने २० षटक २२२ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. संघातील प्रमुख फलंदाज विराट कोहली बाद होऊन माघारी परतला. दरम्यान विराट बाद होऊन मैदानाबाहेर जात असताना संताप व्यक्त करताना दिसून आला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला हा सामना जिंकण्यासाठी २२३ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीने संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. त्याने ६ चेंडूत २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १८ धावा कुटल्या. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून हर्षित राणा गोलंदाजी करण्यासाठी आला. त्याने पहिलाच चेंडू फुल टॉस टाकला. जो विराटच्या बॅटला लागून हवेत गेला.

हर्षित राणाने कुठलीही चूक न करता सोपा झेल टिपला. त्यानंतर अंपायरने त्याला बाद घोषित केलं. विराटने क्षणही न दवडता DRS ची मागणी केली. या DRS मध्ये चेंडू कंबरेच्या वर असल्याचं दिसून आलं. मात्र तरीदेखील अंपायरने आपला निर्णय न बदलता त्याला बाद घोषित केलं. अंपायरच्या या निर्णयावर विराट कोहली संताप व्यक्त करताना दिसून आला.

अंपायरने बाद घोषित केल्यानंतर विराट मैदानाबाहेर जात असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो रागात असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान त्याने रागात डस्टबिन पायाने उडवलं. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने २० षटक अखेर २२२ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला २२१ धावा करता आल्या. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने केवळ १ धावेने गमवावा लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kumbh Rashi : आजचा दिवस पैशाच्या बाबतीत शुभ आहे,मात्र करिअर...; वाचा कुंभ राशीभविष्य

Dussehra 2025 Date: कधी आहे दसरा? जाणून घ्या रावणाच्या दहनाची तिथी आणि शुभ मुहूर्त

Railway Station : कृपया प्रवाशांनी लक्ष द्या! अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव बदललं, नवीन नाव काय? जाणून घ्या

मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे फाईल बाहेर काढणाऱ्या अंजली दमानियांच्या पतीवर सरकार खूश; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Cat Worshipped As Goddess: 'या' देशात मांजरींची होते देवाप्रमाणे पूजा; भक्त अर्पण करायचे सोन्याचे दागिने

SCROLL FOR NEXT