Virat kohli news in marathi twitter
क्रीडा

Virat Kohli Viral Video: शतक हुकल्यानंतर किंग कोहलीला राग अनावर!ड्रेसिंग रुममध्ये जाताच केलं असं काही..,VIDEO होतोय व्हायरल

Ankush Dhavre

Virat Kohli Latest News In Marathi:

चेपॉकच्या मैदानावर भारतीय संघाने इतिहास घडवला आहे. रविवारी झालेल्या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने २०० धावांचा पाठलाग करताना दमदार खेळ केला.

यासह भारतीय संघाने हा सामना ६ गडी राखून जिंकला. विजयाच्या अगदी जवळ असताना विराट कोहली बाद होऊन माघारी परतला. दरम्यान ड्रेसिंग रूममध्ये पोहोचताच त्याचा संताप व्यक्त केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

भारतीय संघ अडचणीत असताना विराटने ११६ चेंडूंचा सामना करत ८५ धावांची खेळी केली. मात्र भारतीय संघाला केवळ ३३ धावांची गरज असताना विराट कोहली बाद झाला. जोश हेजलवूडच्या गोलंदाजीवर विराटने पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्याचा प्रयत्न फसला आणि तो मार्नस लाबुशेनच्या हातून झेलबाद होऊन माघारी परतला. जर त्याने ही चूक केली नसती तो शेवटपर्यंत टिकून भारतीय संघाला सामना जिंकवूनच माघारी परतला असता. यादरम्यान त्याचं ४८ वं वनडे शतकही हुकलं.

विराटचा व्हिडिओ व्हायरल...

विराट कोहली बाद झाल्यानंतर जेव्हा ड्रेसिंग रूममध्ये परतला, त्यावेळी तो संताप व्यक्त करताना दिसून आला. ड्रेसिंग रूममध्ये पोहचल्यानंतर त्याने आपल्या शॉटचा रिप्ले पहिला. त्यानंतर तो निराश दिसून आला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Latest sports updates)

भारताचा शानदार विजय..

भारतीय संघाने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. पहिल्याच लढतीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून विजय मिळवला आहे. या सामन्यात पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र ऑस्ट्रेलियाचा डाव केवळ १९९ धावांवर संपुष्टात आला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून विराट कोहलीने ८५ तर केएल राहुलने नाबाद ९७ धावांची खेळी केली. यासह भारतीय संघाने ५२ चेंडू शिल्लक ठेऊन हा सामना जिंकला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT