Big Breaking: विश्वचषकानंतर विराट कोहली कर्णधार पद सोडणार Saam Tv
Sports

Big Breaking: विश्वचषकानंतर विराट कोहली कर्णधार पद सोडणार

काही दिवसांपुर्वी विराटच्या कर्णधार पदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

वृत्तसंस्था

बराच काळ विराटच्या कर्णधारपदाबाबत चर्चा होती. काही दिवसांपूर्वी असे वृत्त आले होते की, टी -20 विश्वचषक (T-20 World Cup) संपल्यानंतर तो टी-20 च्या कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे. गुरुवारी, 16 सप्टेंबर रोजी संध्याकाळी त्याने सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) ट्विटरच्या माध्यमातून घोषणा केली आहे की, तो टी -20 विश्वचषक 2021 नंतर भारतीय टी 20 संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे. यानंतर, तो भारतीय एकदिवसीय आणि कसोटी संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे. विराट कोहलीच्या या खेळीनंतर आता रोहित शर्माला भारतीय टी 20 संघाचे कर्णधारपद सोपवले जाण्याची सर्व शक्यता आहे. रोहित शर्मा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे आणि त्याचा विक्रम उत्कृष्ट आहे.

विराटने टी-20 संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर आता रोहित शर्माला या फॉरमॅटमध्ये संघाची कमान सोपवण्याचा निर्णय घेण्यात येतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. विराटच्या जागी बऱ्याच दिवसांपासून त्याला या फॉरमॅटमध्ये कर्णधार बनवण्याची मागणी होत होती.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks: गॅसवर ठेवताच दूध पटकन फाटते? गरम करताना ही गोष्ट लक्षात ठेवाच

Leopard : ४ पाय कापलेले, १८ नखे गायब, ऊसाच्या शेतात आढळला बिबट्याचा मृतदेह, साताऱ्यात खळबळ

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाटकं करू नये - चव्हाण

Shocking: विद्यापीठात रक्तरंजित थरार! परीक्षेदरम्यान अंदाधुंद गोळीबार, दोघांचा जागीच मृत्यू

Municipal Elections : २९ महापालिका निवडणुका एकाच टप्प्यात, घोषणा कधी होणार? महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT