Virat Kohli Dance On Nepali Song saam tv
Sports

Virat Kohli Dance Video: विराटचा पहाडी अंदाज! नेपाळी गाणं वाजताच केला भन्नाट डान्स, VIDEO व्हायरल

Virat Kohli Dance On Nepali Song: विराटचा नेपाळी गाण्यावर केलेल्या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

Ankush Dhavre

Virat Kohli Dance On Nepali Song Viral Video:

भारतीय संघाने नेपाळविरूद्ध झालेल्या सामन्यात जोरदार कामगिरी करत विजय मिळवला आहे. यासह भारताचा संघ सुपर ४ फेरीसाठी पात्र ठरला आहे. या सामन्यात भारताच्या फलंदाजांनी नेपाळच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.

मात्र याच सामन्यात भारतीय क्षेत्ररक्षकांकडून खालच्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आहे. अवघ्या २१ चेंडूंमध्ये भारतीय क्षेत्ररक्षकांनी ३ सोपे झेल सोडले.

या झेल सोडणाऱ्यांमध्ये विराट कोहलीचा देखील समावेश होता. दरम्यान त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे,ज्यात तो नेपाळी गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली फलंदाजीसह आपल्या डान्स स्टेप्ससाठी देखील तितकाच प्रसिद्ध आहे. एकिकडे भारतीय क्षेत्ररक्षक सोपे झेल सोडत होते. तर दुसरीकडे विराट कोहली डान्स करण्यात व्यस्त होता. सामन्यातील दुसऱ्या षटकात विराटने झेल सोडला होता. त्यानंतर १४ व्या षचकात विराटचा कुल अंदाज पाहायला मिळाला.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तु्म्ही पाहु शकता की, १४ व्या षटकात कर्णधार रोहित शर्मा क्षेत्ररक्षण सजवण्यात व्यस्त आहे. तर दुसरिकडे विराट डान्स करण्यात व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Latest sports updates)

भारताचा सुपर ४ मध्ये प्रवेश..

नेपाळला पराभूत करत भारतीय संघाने सुपर ४ मध्ये प्रवेश केला आहे. भारताचा पहिला सामना पाकिस्तान संघाविरूद्ध रंगला होत. हा सामना पावसामुळे धुतला गेला होता. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिला गेला होता.

तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने जोरदार विजय मिळवत भारतीय संघाने सुपर ४ मध्ये प्रवेश केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: 12वी फेल, २ वर्षे दूध विकले, मोठ्या जिद्दीने केली UPSC क्रॅक; नाशिकच्या लेकाची यशोगाथा

Asim Munir : ट्रम्पच्या कुबड्यांवर मुनीरच्या बेडूक उड्या;पाकचा हिटलर अमेरिकेत बरळला, VIDEO

Tuesday Horoscope : ५ राशींच्या लोकांवर गणरायाची कृपा होणार; धन, सुख,समृद्धीचा वर्षाव होणार, वाचा मंगळवारचं राशीभविष्य

Manoj Jarange : मराठा आंदोलनात दंगल घडवण्याचा कट? मनोज जरांगेंचा गंभीर आरोप, VIDEO

Pune: जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, रमी खेळताना भाजप पदाधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं; पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT